अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर :- खेडोपाडी जाऊन गावातील रस्ते हातातील खराट्याने झाडत संत गाडगे बाबा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले.लोकजीवन तेजाने उजळविण्यासाठी प्रबोधनाचेही मोठे कार्य त्यांनी केले. म्हणूनच गाडगे बाबा हे स्वतः चालते-फिरते समाजशिक्षक होते…
शिक्षण,साक्षरता, स्वच्छता आणि मानवतेचा प्रसार करणाऱ्या या महान विभूतीस शतशः नमन
निष्काम कर्मयोगी, मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबायांची १४८वी जयंती उत्सव दि २३ फेब्रुवारी २०२४रोजी सकाळी राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकात सकाळी न.पा अमळनेर आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडेसाहेब कदम साहेब मुकादम श्याम करंदीकर पुनमचंद संदाशिव व अमळनेर न पा.चे सफाई कर्मचारी यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करण्यात आले
दुपार सत्रात ह.भ.प.प.पू.प्रसादजी महाराज यांच्याहस्ते गाडगे बाबाच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून मुख्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली . याप्रसंगी युवा परीट मंडळ व परदेशी धोबी समाज कार्यकारिणी,सल्लागार व समाज बांधव उपस्थित होते..
मिरवणुकीच्या मार्गावर , गाडगेबाबा चौकात व संत गाडगेबाबा उद्यानात सुशोभित वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या .
“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” चा जयघोष , भजने , माऊली भजनी मंडळ व पारंपारिक वाद्यचा तालावर मिरवणूक वाडीचौक- पानखिडकी- सराफ बाजार -दगडी दरवाजा- गाडगेबाबा चौक मार्गे मिरवणूक गाडगेबाबा उद्यानात समारोप करण्यात आला
राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकात मदत पुनर्वसन व आपत्ती कॅबिनेट मंत्री मा.ना.दादासाहेब अनिल पाटील यांच्या शुभहस्ते गाडगेबाबा प्रतिमेचे पूजन माल्यार्पण व आरती करण्यात आली तर मिरवणुकीच्या समारोप राष्ट्रसंत गाडगेबाबा उद्यानात मराठी साहित्य संमेलनाचे गीत लिखाण करणारे समाज बांधव डॉ. श्री रमेशजी माने सर यांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीच्या समारोप करण्यात आला
गाडगेबाबा चौकात राकेश भाऊ परदेशी ,युवा परीटधोबी मंडळ व परदेशी धोबी समाजाच्या वतीने महाप्रसाद व शरबत वाटप कार्यक्रम करण्यात आला. सदरजयंती व मिरवणुक कार्यक्रमास “युवा परीट मंडळ” व “परदेशी धोबी समाज” बंधु व भगिनी मोठ्या व विक्रमी संख्येने उपस्थित होते.