शौचालय भ्रष्टाचार प्रकरणी अखेर ३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दोषींवर भडगांव पोलीस स्टेशन मध्ये ग्रामसेवकावर फौ.गुन्हा दाखल

 

प्रतिनिधी :-  भडगांव तालुक्यातील पळासखेडे येथील ग्रामपंचायत अंन्तर्गत सन २०१६/१९ वर्षाच्या कालावधीत ग्रामसेवक जिभाऊ सुकदेव पाटील. सुधाकर बागुल यांनी २०८ बोगस लाभार्थी दाखवून ग्राम पंचायत हेडवर परस्पर २४ लाख ८५ हजार रुपये चा अपहार केल्याचे लखवाल चौकशीत २०२१ मध्ये निष्पन्न झाले होते. याप्रकरणी ३ वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर दोषी भ्रंष्टाचारी ग्रामसेवक व ईतरांवर आज दि.२५ जानेवारी २०२४ रोजी प.समीती वि.अधिकारी अशोक खैरनार यांनी भडगांव पो.स्टे ला.फौज- गुंन्हा fir cr. 20/2024.अन्वये गुंन्हा दाखल करण्यात आला आहे..
सदर प्रकरणी विजय दोधा पाटील यांनी दिलेल्या फिर्तयाद तक्रारीवरून  सहा.बीडीओ श्री.लखवाल भडगांव यांनी व एरंडोल बीडीओ अशा दोन अधिकारी यांनी दोन चौकशी अहवाल सादर केले आहेत.. एरंडोल चौकशी अहवालात खोटे व जुने शौचालय बांधकाम झालेले बोगस दाखवून अपहाराची रंक्कम कमी दाखवली प्रत्येक्षात अपहार ३१लाख ८४ हजाराचा आहे. नियमानुसार लाभार्थी च्या बँक खात्यात रक्कम देणे बंधनकारक आहे. असे असतांना कुठल्याही लाभार्थीच्या बँक खात्यात रक्जकम जमा न करता ग्राम पंचायत हेडवर ठेकेदार दाखवून रक्कम परस्पर काढून अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. ३५ लाभार्थी २० वर्षापुर्वी मयत असलेले व्यक्ती जिवंत दाखवून शौचालय अनुदान बिले काढलेले आहेत. सदर सखोल चौकशी चे कामकाज हे रावेर चे शौचालय घोटाळा चौकशी अधिकारी पो.उपनिरीक्षक यांचे कडे देण्याची मागणी विजय पाटील हे जिल्हा पोलिस अधीक्षक सो.जळगांव यांचे कडे करीत आहेत

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!