( प्रहार Today वृत्तसेवा ) पाचोरा : जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा लाचखोरीची घटना समोर आली आहे. घरकुलासाठी नमुना नं.८ मध्ये ग्रामसेवकाकडून जागा नावावर करून देण्याकरिता पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु. येथील सरपंच अनिल विश्राम पाटील (वय ४६ वर्ष) याने १० हजाराची लाच मागितली. ती लाच स्वीकारताना खाजगी इसम बलराम हेमराज भिल (वय ४६ वर्ष) दोन्ही रा.खळकदेवळा बु| ता.पाचोरा हे जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केल्याने एकच खळबळ उडाली. अनिल विश्राम पाटील (वय ४६ वर्षे) असं सरपंचाचे नाव असून बलराम हेमराज भिल (वय ४६ वर्षे) असं खाजगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,
तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी असून, त्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नव्हती. त्यांच्या नावावर गाव नमुना ८ अ मध्ये नाव लावण्यासाठीचे काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याच्या मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी शुक्रवार दि. २७ रोजी १० हजार रुपयांची लाच मागणी केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली व पडताळणी करण्यात आली.
शुक्रवारी दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी खाजगी समाजाकडे लाच देण्याचे सरपंचांनी सांगितल्यानंतर खाजगी इसम बलराम बिल याला लाच स्वीकारतांना ताब्यात घेण्यात आले दोघांना अटक करण्यात आली व पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला जळगाव एसीबी चे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेश सिंग पाटील, राकेश दुसाने, तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, हवालदार रवींद्र घुगे, सुनील वानखेडे, शैला धनगर, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वीरित्या पार पाडला.