(प्रहार Today वृत्तसेवा) धुळे : गेल्या काही दिवसात लाच खोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पातळीवरही तलाठी, सरपंच, ग्रामसेवक हे लाचेची मागणी करत असताना दिसत आहे. यातच आता आणखी एक घटना समोर आली नंदाने येथील सरपंचासह व माजी सरपंच धुळे एसीपीच्या जाळ्यात अडकले आहेत सरपंच रवींद्र निंबा पाटील व माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदाराकडे पेट्रोल पंप उभारणी करिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अडीच लाख रुपये ला अशीच मागणी करून त्यापैकी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना दोघांना रंगे हात पकडण्यात आले आहे. नंदाने तालुका धुळे येथील गट नंबर 59/3 येथे तक्रारदाराची शेतजमीन असून, या जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळण्याकरिता कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांनी 01 सप्टेंबर 2024 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने नंदाने ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवकाच्या नावे पेट्रोल पंप उभारणी करीता ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरिता दिलेले पत्र तक्रारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत गुलाबराव पाटील यांच्याकडे जमा केले होते.
त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या मित्रासह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच रवींद्र निंबा पाटील ग्रामसेवक शशिकांत गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला असता, सरपंच रवींद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतः करिता व ग्रामसेवक शशिकांत गुलाबराव पाटील यांच्या करिता पाच लाख रुपये लाचीची मागणी केली तशी तक्रार दिनांक 24 रोजी तक्रारदार यांनी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. त्यानुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे.
त्यानंतर धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सरपंच रवींद्र पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून, एक लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारून, माजी सरपंच अतुल शिरसाट यांचेकडे दिली असता, त्यांनी ती स्वीकारून त्यांनी ते पैसे खिशात ठेवून दिले. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना रंगेहात पकडले यानंतर सरपंच रवींद्र पाटील आणि अतुल शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमांन्वये, गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.