( प्रहार Today वृत्तसेवा ) : पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ येथे दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असताना, अचानक जोराने वीज कोसळून १,७५,०००/- रुपये किमतीची म्हैस मरण पावल्याची घटना घडली आहे.
सावखेडा होळ येथील रहिवाशी श्री. हिरालाल अशोक पाटील यांची १,७५,०००/- रुपये किमतीची म्हैस सावखेडा होळ गावाबाहेरील दवाखान्याजवळ बांधलेली होती. पहाटे ५:०० वाजता अचानक जोराने वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत स्थानिक तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व म्हशीचे शवविच्छेदन करून जमिनीत पूरण्यात आली शेतकऱ्याने मयत म्हशीची नुकसान भरपाई मिळावी अशी स्थानिक प्रशासनाकडे मागणी केली आहे.