शिरीषदादा चौधरी यांना निवडून देण्यासाठी अमळनेरसह पारोळा तालुक्यातील प्रहार अपंग संघटनेकडून बहुसंखेने पाठींबा.

(प्रहार Today वृत्तसेवा) अमळनेर दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये, अमळनेर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार मा.शिरीषदादा चौधरी यांना यावेळी बहुसंखेने निवडून देण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अमळनेर तालुक्यातील किमान पाच हजार चारशे तर पारोळा तालुक्यातील सहाशे अपंग (दिव्यांग) बंधू भगिनींनी बहुसंखेने पाठींबा दिला असल्याचे पत्र डॉ.रविंद्र चौधरी यांचेकडेस सुपूर्द केले आहे.

पुन्हा एकदा मा.शिरीषदादा चौधरी यांना अमळनेर विधानसभा निवडणूकीत विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे वृत्त प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी दिले आहे. मा.शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातील दिव्यांग एकवटला आहे. मतदार संघातील अपंगाच्या अडी-अडचणी, व्यथा, योजना व अपंगांचा सर्वांगीण विकासाला बळकटी देण्यासाठी व अपंगाचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी अ.क्र.११ बॅट समोरील बटन दाबून पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार मा.शिरीषदादा चौधरी यांना निवडून द्यावे असे आवाहन प्रहार अपंग क्रांती संघटना- तालुकाध्यक्ष योगेश पवार, प्रहार शेतकरी संघटना – तालुकाध्यक्ष  प्रदिप बोरसे व प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष- रविंद्र पाटील यांनी केले आहे.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!