अमळनेर (प्रहार Today वृत्तसेवा) : दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ हा संपूर्ण भारतात लागू झाला असल्याने त्या अंतर्गत २१ प्रकारचे नवीन दिव्यांगाचे प्रकार यात समाविष्ट करून, केंद्र शासनाने युडीआयडी (udid) प्रणाली www.swavlambancard.gov.in हे अस्तित्वात आणून, संपूर्ण भारतात एकाच प्रणालीवरून प्रत्येक जिल्हा व निवडक तालुका येथून दिव्यांग प्रमाणपत्र शासकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचेकडून योग्य वैद्यकीय तपासणी करून दाखला ऑनलाईन वितरित करण्यात येतो.
त्यानुसार केंद्र शासनाकडून प्राप्त माहितीनुसार सदर दिव्यांग प्रमाणपत्र प्रणालीवर दि.१ मे २०२४ सायंकाळी ५ वाजेपासून ते दि.६ मे सकाळी १० वाजेपर्यंत सदर पोर्टल तांत्रिक अडचणीयेत असल्यामुळे तसेच अधिक चांगल्या प्रकारच्या सुविधा दिव्यांग बांधवांना या पोर्टलवरून मिळतील म्हणून सदर प्रणाली बंद असल्याचे कळविले आहे. त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करणे, प्रमाणपत्र डाउनलोड करणे, नूतनीकरण करणे, अर्जात बदल करणे या कालावधीत सदर udid संकेतस्थळावरन कुठलेही काम होऊ शकणार नाही.