बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी प्रमोदिनी बळीराम पाटील यांच्या अडचणीत वाढ…! दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी काढले पुन्हा कारवाईचे आदेश..

(प्रहार Today वृत्तसेवा) अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप हायस्कूल अमळनेर मधील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती.प्रमोदिनी बळीराम पाटील (कोळी) यांनी एस.ए.डी.एम. संकेतस्थळावरील दिसणाऱ्या प्रमाणपत्रासारखे दिसणारे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून, विविध शासकीय योजनाचा लाभ घेत सन २०१६ ते २०२३ या वित्तीय वर्षात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बेकायदेशीर लाभ घेत शासनाची दिशाभूल करून शासनास लाखो रुपयांचा चुना लावला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय जळगांव यांनी प्रमोदिनी पाटील (कोळी) यांचे दिव्यांग प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून निर्गमित झालेले नाही व ते बनावट स्वरूपाचे असल्याचा अभिप्राय देत अहवाल शिक्षणाधिकारी (माध्य.) जळगांव यांना दिलेत. शिक्षणाधिकारी (माध्य.) जळगांव यांनी बोगस लाभार्थी प्रमोदिनी पाटील (कोळी) यांनी घेतलेले व चालू असलेले लाभ तात्काळ स्तगीत करण्याचे आदेश काढले होते.

या बाबत तक्रारदार यांनी सदर प्रकरण अमळनेर न्यायालयात न्यायप्रविष्ठ असतांना पुणे येथील प्रहार संघटनेचे पदाधिकारी श्री.राजेंद्र वाकचौरे व श्री.दत्ता भोसले यांनी दिव्यांग कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे (Disability Commissioner) श्री. प्रवीण पुरी (IAS) यांच्या कडेस सदर प्रकरणाचे पुरावे सादर करून तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. त्याच मागणीच्या आधारे दिव्यांग कल्याण आयुक्त (Disability Commissioner) श्री. प्रवीण पुरी (IAS) यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती.प्रमोदिनी बळीराम पाटील (कोळी) या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांना त्यांच्या स्तरावरून शासन नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश बुधवारी दि.२१/०८/२०२४ रोजी सायंकाळी उशिराने काढले आहेत.

सदर प्रकरणी दिव्यांग कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे (Disability Commissioner) श्री. प्रवीण पुरी (IAS) यांनी आपल्या स्तरावरून बोगस दिव्यांग लाभार्थी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती.प्रमोदिनी बळीराम पाटील (कोळी) यांचेविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच औंध जिल्हा रुग्णालय यांनी नियमबाह्य, बेकायदेशीररित्या दिलेले UDID प्रमाणपत्र तत्काळ रद्द करण्यात यावे. अशी मागणी केली आहे. अन्यथा दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे राज्यस्तरीय आंदोलन देखील करू अशी माहिती श्री.राजेंद्र वाकचौरे यांच्या भ्रमणध्वनी वरून प्रहार Today ला दिली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित हे काय ? कार्यवाही करतील व दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे श्री. प्रवीण पुरी हे नव्याने कोणते ? आदेश काढतील तथाकथित पूजा खेडकर (P.K) प्रकरणासारखेच प्रमोदिनी कोळी (P.K) प्रकरणी देखील महाराष्ट्रातील प्रहार Today च्या वाचकांसह संपूर्ण दिव्यांगांचे लक्ष लागले आहे.

क्रमश:…………   

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!