शासकीय सेवेत असतांना रेशन घेणे पडले महागात.!

 

(प्रहार Today वृत्तसेवा) अमळनेर : येथील सामाजिक कार्यकर्ते सुमित प्रदीप पाटील यांनी एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती शासकीय सेवेत शिक्षक असलेल्या १.प्रदीप सुकदेव पाटील , २.मेघा सुकदेव पाटील, ३.संदीप सुकदेव पाटील हे शांती निकेतन प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत शासकीय सेवेत कार्यरत असताना, सदर कुटुंबात लाखो रुपयांचे वेतन असतांना, शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीरपणे रेशन घेत असल्याची तक्रार सुमित पाटील यांनी दि.२० मार्च २०२३ रोजी तहसीलदार अमळनेर यांचेकडे केलेली होती, सदर तक्रारीची गंभीर दखल घेत दि.२८ ऑगस्ट २०२४ रोजी अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी संबंधित शिधापत्रिका धारक श्री.सुकदेव धोंडू पाटील रा.मंगल नगर, चोपडा रोड, अमळनेर यांचे कडून सन २०१२ ते जुलै २०२४ पर्यंत एकूण घेतलेल्या रेशन मालाची प्रचलित बाजार भावाप्रमाणे गहू २७.०३०५/- रुपये तर तांदूळ ३९.१८०५/- रुपये प्रतिकिलो याप्रमाणे एकूण रक्कम रुपये १,२३,३८२/- या रक्कमेवर व्याज ९% प्रमाणे र.रु.१,३४,४८७/- इतके व्याजासह शासन सदरी १५ दिवसांत चलनाने भरणा करणेबाबत आदेश निर्गमित केले आहेत. तसेच तहसीलदार अमळनेर यांनी सदर व्यक्तीचे प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ देखील थांबवण्यात आला आहे. या कार्यवाहीने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या, शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीरपणे रेशनचा लाभ घेत असलेल्या व्यक्तींवर अश्याच प्रकारे कारवाई करण्यात येईल असेही तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सांगितले आहे.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!