खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या पनवेल पोलिसांनी आवळल्या मुसक्यायूपी पोलिसांनी आरोपीवर जाहीर केले होते ५० हजारांचे बक्षिस.

मुंबई प्रतिनिधी

नवी मुंबई : खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असताना दीड वर्षांपूर्वी यूपी पोलिसांना चकमा देऊन पळ काढलेल्या आरोपीच्या पनवेल शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या आरोपीवर यूपी पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. आरोपीला पुढील कारवाईसाठी रितसर यूपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
खुनाच्या गुन्ह्यात रामकोला पोलीस ठाण्यात (जिल्हा कुशीनगर) गु.र.क्र. ३२६/२०२२ भादंवि कलम ३०२, ५०६ नुसार प्रविण उर्फ प्रदिप रामआजोर पाल (वय- २५ वर्ष, रा. गाहिरो खिटारान, इनायतनगर, अयोध्या, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी जिल्हा कारागृह दवरिया (उत्तर प्रदेश) येथे करण्यात आली. दरम्यान, १ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याला उपचाराकरीता जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. तेथे बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांना चकमा देऊन पाल याने पळ काढला. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कोतवाली पोलीस ठाणे (गु.र.क्र. ७६४/२०२२ भादवि कलम २२३, २२४ अन्वये) गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र, तो भेटला नाही. अखेर यूपी पोलिसांनी त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले.
तपास सुरू असताना २७ फेब्रुवारी २०२४ आरोपी प्रवीण उर्फ प्रदीप रामआजोर पाल हा पनवेल रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती वाराणसी एसटीएफच्या अधिकारी व अंमलदारांना प्राप्त झाली. त्यानुसार त्याच्या अटकेसाठी यूपी पोलिसानी पनवेल शहर पोलिसांकडे मदत मागितली. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी तात्काळ सापळा लावून आरोपी प्रविण उर्फ प्रदिप रामआजोर पाल याच्या मुसक्या आवळल्या.
ही उत्तम कामगिरी पोलीस आयुक्त मिलीद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपुत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुमन बागवान, पोलीस निरीक्षक प्रविण भगत, पोलीस निरीक्षक राघवेंद्र मिश्रा व पथक, नेमणुक एसटीएफ वाराणसी, उत्तर प्रदेश, सपोनि प्रकश पवार, पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे हवालदार आमोल पाटील, पोलीस नाईक मिथुन भोसले, पोलीस नाईक लक्ष्मण जगताप, पोलीस अंमलदार विशाल दुधे यांनी केली.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!
नमस्कार!
आम्ही आपली काही मदत करू शकतो?