मंगळग्रह मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महासोहळा प्रारंभी व पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते जलाधिवास पूजन.

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर : येथे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवार, १ मार्च रोजी मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळाप्रारंभी विविध मंत्रोपचारासह पूजाविधीद्वारे जलाधिवास पूजन केले.
मंगळग्रह मंदिरात आजपासून श्री कालभैरव, भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता यांच्या मूर्तींचा विधिवत भव्य प्राणप्रतिष्ठा महासोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा पूर्वी त्यांच्यातील सर्वदोष दूर व्हावेत व ते शुद्धाधि अतिशुद्ध होऊन तेजपुंज व्हावेत यासाठी श्री.कराळे व अन्य मानकऱ्यांच्या हस्ते जलाधिवास पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री.कराळे यांनी श्री मंगळग्रह देवता मंदिरासमोरील सभामंडपात नवग्रह होम व मूर्ती दोष निवारणासाठी कुटीर होम पूजनही केले. त्यानंतर पूजेची पूर्णाहुती होऊन सायंआरती झाली.
तत्पूर्वी मंगल सेवेकरी आशा महाले यांनी श्री कराळे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचे औक्षण केले. त्यानंतर कराळे यांनी श्री मंगळग्रह मंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेतले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले ,उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांनी त्यांची नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल कराळे यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व मंगलप्रसाद देऊन यथोचित सन्मान केला .संपूर्ण मंगळ ग्रह सेवा संस्था परिवारातर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, गोपनीय शाखेचे डॉ.शरद पाटील, रवींद्र पाटील, पोलीस शिपाई गणेश पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान दोन सत्रात झालेल्या या पूजनात १ रोजी सकाळी ८.०० ते दु. १२.०० प्रथम सत्रात प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, देवता स्थापन भक्तिमय वातावरणात पार पडले. या पूजेसाठी विशाल शर्मा, बाळा पवार, राजेंद्र चौधरी, चंद्रकांत महाजन, जयेश काटे, मनोहर महाजन, मनीष जोशी, व्ही. व्ही. कुलकर्णी, प्रशांत सिंघवी, पंकज मुंदडा, प्रकाश शिरोडे आदी, तर दुपारी २.००-ते सायं. ६.०० या द्वितीय सत्रात अग्नी स्थापन, जलाधीवास, ग्रह स्थापन, ग्रहयज्ञ, सायंपूजा होऊन आरती झाली. या पूजेसाठी ॲड. व्ही. आर. पाटील, शिरीष पाटील, डॉ. शरद बावीस्कर, योगेश मुंदडे, एस.एन.पाटील, चंदन कोल्हे, आनंद महाले, हिरालाल पाटील, चिंधू पाटील, यशवंत पाटील, संजय पाटील व महावीर पहाडे हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते.
या पूजेसाठी वेदमूर्ती केशव पुराणिक शास्त्री, सागर कुलकर्णी शास्त्री, प्रतीक मुळे शास्त्री, प्रसाद साठे शास्त्री, वैभव जोशी शास्त्री, प्रसाद भंडारी शास्त्री, तुषार दीक्षित शास्त्री, जयेंद्र वैद्य शास्त्री, गणेश जोशी शास्त्री, अक्षय जोशी शास्त्री, मंदार कुलकर्णी शास्त्री, चंद्रकांत जोशी शास्त्री, विनोद पाठक शास्त्री, हेमंत गोसावी शास्त्री, नरेंद्र उपासनी शास्त्री, सारंग पाठक शास्त्री, सुनील मांडे शास्त्री, व्यंकटेश कळवे शास्त्री आदी पुरोहितांनी पौरोहित्य केले.
महासोहळ्याचा आज दुसरा दिवस
शनिवार, २ मार्च रोजी सकाळी ८.०० दु. १२.00 दरम्यान प्रात: पूजन, जलयात्रा, वास्तुशांती शांतीक पौष्टिक हवन तर दु. २.०० तेसायं. ६.०० दरम्यान मुख्य देवता हवन, मंदिर व मूर्ती स्थापन, तत्वन्यास, धान्यादीवास, शय्याधीवास, सायंपूजा होणार आहे.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!