येथील १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये युवांसाठी प्रेरणादायी असे वक्ते, लेखक विचारवंत उपस्थित राहणार..!

अमळनेर :- येथील १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये युवांसाठी प्रेरणादायी असे वक्ते, लेखक विचारवंत, कलाकार, विद्यार्थी नेते, युवांशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधतील. युवांसाठी कथांचे अभिवाचन , नाटक, एकांकिकासह परिसंवाद, गट चर्चा, काव्य व गझल संमेलन, युवा रॅप सिंगर चे रॅप गीते, शैक्षणिक धोरणावर चर्चा यासह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असून विविध विद्यापीठांमध्ये लढलेले विद्यार्थी कार्यकर्ते व लोकशाहीवादी कार्यकर्ते यांचा गौरव विद्रोहीच्या मंचावर करण्यात येणार आहे.
विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ‘आसक्त’ प्रस्तुत ‘ मंटो कि बदनाम कहानियाँ ’ मंटोच्या निवडक कथांचे अभिवाचन होणार असून मराठी अनुवाद चंद्रकांत भोंजळ यांनी केला असून सुयोग देशपांडे यांचे दिग्दर्शन असून यात तृप्ती देवरे, मुक्ता कदम, अतुल जैन हे कलाकार असतील.
विद्रोहाच्या मुख्य मंचावर सुप्रसिद्ध व सर्वाधिक खपाचे आत्मवृत्त ‘भुरा’चे युवा लेखक व तत्वज्ञानाचे प्राध्यापक प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांच्याशी साहित्य संवाद साधला जाणार आहे.
‘गोष्ट पैशापाण्याची’ या बेस्ट सेलर गाजलेल्या पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला असून यात सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक ‘चेकमेट’ कार सुधीर सूर्यवंशी हे संयोजन करतील तर प्रसिद्ध युट्यूबर नितेश कराळे उर्फ कराळे गुरुजी हे या सत्राची अध्यक्षता करणार आहे.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!