Ladki bahin Yojana : 19 ऑगस्टला मिळणार पैसे, तुमचा अर्ज कुठंपर्यंत पोहोचला: कसे बघणार?

(प्रहार Today वृत्तसेवा) Mukhymantri Majhi Ladki Bahin Application Status : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये जमा होणार आहेत. परंतु जुलै आणि ऑगस्टचे असे एकत्रित मिळून सरकार 3000 रूपये खात्यात जमा करणार आहे. येत्या 19 तारखेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी हे पैसै खात्यात येणार आहे. पण तत्पुर्वी तुम्ही केलेला अर्ज हा पात्र ठरणे खुप आवश्यक आहे. यासाठी तुम्ही पात्र ठरलात की नाही हे कसे तपासायचे? हे जाणून घ्या.

राज्य सरकार येत्या 19 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसै जमा करणार आहे. या तारखेला आता अवघे 17 दिवस उरले आहेत. या 17 दिवसात तुम्ही केलेला अर्ज ह्या योजनेसाठी पात्र ठरणे खूप आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या खात्यात पैसै जमा होणार नाही आहेत. त्यामुळे तुम्ही केलेला अर्ज सरकारी पातळीवर नेमका कुठे पोहोचलाय? अर्ज पात्र ठरलाय की अपात्र आहे किंवा रिजेंक्ट करण्यात आला आहे? हे नेमकं कसं तपासायचं आहे?

तुम्हाला तुम्ही केलेल्या अर्जाचे स्टेटस नारीशक्ती दूत Apps च्या माध्यमातून पाहता येणार आहे. आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारीशक्ती दूत Apps मध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करावे . यामध्ये तुम्ही केलेले अर्ज पाहता येतील. आपल्याला ज्या अर्जाचे स्टेटस पहायचे आहे त्या अर्जावर क्लिक करा. आपल्या समोर आपल्या अर्जाची सद्य स्थिति पाहायला मिळेल.

स्टेटसमधल्या ‘या’ पर्यायाचा अर्थ काय?

Approved

जर तुम्हाला अर्जात स्टेटस Approved असे दाखवत असेल तर अभिनंदन तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमीट झाला आहे. आता आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

Pending for Approval

आपल्या अर्जात असा पर्यंत दाखवत असेल तर आपला अर्ज अजून तपासण्यात आला नाही आपल्याला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे आपला अर्ज लवकरच तपासण्यात येईल.

Edit and Resubmit

आपल्या अर्जात असा पर्याय दाखवत असल्यास आपण आपल्या अर्जातील त्रूटी काढणे आवश्यक आहे. आपल्या अर्जात जी त्रूटी दिली आहे ती त्रूटी काढून आपला अर्ज परत सबमीट करावा लागणार आहे.

 

Reject

जर आपल्या अर्जात वरील प्रमाणे म्हणजे REJECT हा  पर्याय दाखवत असेल तर आपल्याला आपला अर्ज का reject केला. या बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्या कारणास्तव आपला अर्ज रीजेक्ट करण्यात आलेला आहे.

 

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!