जळगांव प्रतिनिधी
जळगाव : येथे योग्य आहार-विहार ठेवून आदर्श दिनचर्या ठेवण्याबरोबर दृढ मनचर्या ठेवल्यास हृदयरोग सहज टाळता येतो असे प्रतिपादन डॉ. रतन राठोड, सुप्रसिद्ध कॉर्डिओलॉजिस्ट, मुंबई यांनी केले. ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या वतीने कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल प्रभागाद्वारे ढाके कॉलनी मधील सेवाकेंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात डॉ. रतन राठोड, हृदयरोग तज्ज्ञ, मुंबई आणि डॉ. सचिन परब, लाईफ कोच ट्रेनर, मुंबई यांनी हृदयरोग टाळण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. प्रथम डॉ. रतन राठोड यांनी आदर्श दिनचर्ये बरोबर दृढ मनचर्या ठेवल्यास हृदय रोगापासून कसे दूर राहता येईल यावर मार्गदर्शन केले. डॉ. सचिन परब यांनी आपल्या अनुभवयुक्त मागदर्शनात बदलती जीवनशैली आणि आहार-विहारातील बदलामुळे हृदयरोग आजार दिवसेंदिवस कसा वाढत आहे आणि या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणती उपाय योजना करावी यावर मार्गदर्शन केले.
प्रारंभी ब्र.कु. मिनाक्षीदीदी, उपक्षेत्रीय निर्देशिका, जळगाव यांनी प्रस्तावना केली. डॉ. किरण पाटील यांनी स्वागत संबोधन तर डॉ. अंकुश कोलते यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन ब्र.कु. वर्षा यांनी केले. सकाळी डॉक्टारांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही कार्यक्रमासाठी शहरातील नागीरकांबरोबर वैद्यकिय क्षेत्रातील व्यक्तिनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला. दिनचर्ये बरोबर मनचर्येकडेही लक्ष द्या – डॉ. राठोड मानसिक ताण तणाव, विचारांची घालमेल यामुळे मन अशांत होऊन त्याचा प्रभाव शरीरावर निश्चित होतो. तेव्हा आदर्श दिनचर्या हृदयरोगापासून दूर ठेवते हे खरे असले तरीही दृढ मनचर्या मजबूत हृदय बनविण्यास सहाय्य करते. त्यासाठी व्यायाम, प्राणायाम याबरोबर राजयोग ध्यानाभ्यासही करावा असे मुंबई येथील सुप्रसिद्ध कॉर्डिऑलॉजिस्ट डॉ. रतन राठोड, विभागप्रमुख कॉर्डिऑलॉजी विभाग, एम.जी.एम. मेडिकल कॉलेज, मुंबई यांनी सांगीतले.नकारात्मक बाबी पकडून ठेवणे सोडा – डॉ. परब लहान मुले भांडणे लवकर विसरतात, मात्र मोठी माणसे आयुष्यभर भांडण, त्रागा, आदि पकडून ठेवतात आणि मी आयुष्यभर विसरणार नाही असे वरुन म्हणतात. हीच बाब आहे हृदयरोगाच्या सुरुवातीची. नकारात्मक बाबी सोडणे हाच यावर योग्य उपाय आहे असे मुंबई येथील सुप्रसिद्ध लाईफ कोच डॉ. सचिन परब यांनी सांगितले.