वाळू माफियांची दबंगगिरी : निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला.

जळगाव प्रतिनिधी

६ फेब्रुवारी २०२४

जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची दबंगगिरी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे, नुकतेच दि.६ रोजी मंगळवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास जळगाव – भुसावळ महामार्गावर तरसोद गावानजीक वाळूमाफियांनी जळगाव निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात हल्लेखोरांनी शासकीय वाहन देखील फोडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून भुसावळकडे
जाणाऱ्या डंपरवर कारवाईसाठी निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार व तहसीलदार विजय बनसोडे हे रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी नशिराबाद गावाच्या पुढे अवैध वाळू वाहतूक करणारे एक वाळू डंपर अडविले. काही वेळात त्यांनी आणखी दुसरे डंपर अडविले. दोन डंपर अडविल्यानंतर तहसीलदार बनसोडे हे एक डंपर घेऊन पोलीस स्थानकाकडे घेऊन जात होते. याच वेळी चारचाकीसह दुचाकीने काही अनोळखी वाळूमाफिया त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी लोखंडी पाईपच्या सहाय्याने सोपान कासार यांच्यावर हल्ला चढविला.

हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात सोपान कासार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली झाली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, डॉ.विशाल जैस्वाल यांच्यासह पथक जिल्हा रुग्णालयात पोहचले आहेत.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!