मजुरीचे पैसे मागीतल्याच्या कारणावरून मजुराचा चक्क मालकावर ब्लेड़ने वार.

(प्रहार Today वृत्तसेवा) अमळनेर :- आपल्या मजुरीचे पैसे मागण्यासाठी शेतमजुराने शेतमालकाच्या मानेवर व कानावर ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना दि. २३ रोजी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत निमझरी येथे घडली. या बाबत अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावसाहेब चिंधू पाटील यांच्या शेतात देविदास दगा कोळी हा मजूर मजुरी करत होता. दि. २३ रोजी सायंकाळी ४:३० वाजता शेत मालकाच्या घरी आला आणि मजुरीचे पैसे मागू लागला. तुला मजुरीचे पैसे दिले आहेत असे शेतमालक रावसाहेब पाटील यांनी सांगताक्षणी देविदास कोळी हा शिवीगाळ करत तेथून निघून गेला. त्यानंतर सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास रावसाहेब पाटील हे साकरे गावाच्या रस्त्यावर उभे असताना, देविदास कोळी याने मागुन येत शेतमालक रावसाहेब पाटील यांच्या कानावर व मानेवर चार ते पाच वेळा ब्लेडने वार केले. त्यांच्या कानातून व मानेतून रक्त वाहू लागले.

जवळच्या लोकानी त्यांना अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दवाखान्यात जाऊन जखमी रावसाहेब पाटील यांचा जबाब घेतल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला देविदास दगा कोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास हे.कॉ. सुनिल जाधव करीत आहेत

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!