स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये वसंत पंचमी व मातृ-पितृ पूजन दिन उत्साहात साजरा.

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर – येथिल रोजी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये “वसंत पंचमी व मातृ-पितृ पूजन दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी सरस्वती प्रतिमा पूजन ,विद्येचे साहित्य, संगीत वाद्य यंत्राचे पूजन केले, त्यानंतर सरस्वती मातेची आरती करण्यात आली. कार्यक्रमात पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक वर्गातील सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. इयत्ता चौथीतील आरुष अमृतकर या विद्यार्थ्याने वसंत पंचमी कधी व का? साजरी केले जाते, हे भाषणातून विद्यार्थ्यांना पटवून दिले .त्यानंतर इयत्ता सातवीतील आरव पाटील या विद्यार्थ्याने मातृ-पितृ पूजन दिवसाविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना भाषणातून स्पष्ट केली .तसेच इयत्ता सातवी विद्यार्थिनींनी मातृ-पितृ यांचे महत्त्व स्पष्ट करणारी कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली. त्यानंतर सरस्वती मातेचे अस्तित्व स्पष्ट करून देणारे उत्कृष्ट असे नाटक विद्यार्थ्यांनी सादर केले .सरस्वती मातेचे महती व्यक्त करणारी नृत्य पूर्व प्राथमिक व प्राथमिक वर्गातील चिमुकल्याने उत्कृष्ट असे सादर केले .त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाफ आहे, असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगून वसंत पंचमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच मातृ-पितृ पूजन दिवसाचे महत्व ही विद्यार्थ्यांना पटवून दिले .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका जागृती पाटील यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांची यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!