अमळनेर (प्रहार Today वृत्तसेवा) : ग्रामपंचायतीच्या वार्डातील विकास कामांसाठी तडजोडी अंती दोन लाख रुपये लाचेची मागणी करून ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकातांना धुळे जिल्ह्यातील म्हसदी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मेघशाम बोरसे हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे. तक्रारदार व त्यांची पत्नी यांनी ग्रामसेवक मेघश्याम बोरसे यांची भेट घेऊन त्यांची पत्नी सदस्य असलेल्या वार्डातील विकास कामांना मंजुरी मिळण्याकरिता अर्ज देऊन त्यांना विनंती केली असता ग्रामसेवक यांनी सदर कामाचे अंदाजपत्रकेत १२ लाख रुपये किमतीच्या २० टक्क्याप्रमाणे २ लाख ४० हजार रुपये काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागतील असे सांगितल्याने तक्रारदार यांनी ४ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात समक्ष येऊन तक्रार दिली होती. सदर तक्रारीची ७ मार्च रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांचे कडे तडजोडी अंती दोन लाख रुपये लाचेची मागणी करून सदर रक्कमेपैकी ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर २५ एप्रिल रोजी सापळा आयोजित केला असता ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे दोन लाख रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता ५० हजार रुपये म्हसदी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतः पंचांसमक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध साक्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. धुळे.
तक्रारदार– पुरुष, 47 वर्ष.
आरोपी – मेघशाम रोहिदास बोरसे, वय – 45 वर्ष, ग्रामसेवक म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे ( वर्ग 3), रा. प्लॉट नं. 21, प्लॉट न 21/अ, श्रीगुरु कॉलनी, गोंदूर रोड, एस आर पाटील शाळेच्या मागे, वलवाडी, देवपूर धुळे.
लाचेची मागणी– 2,00,000/- रुपये दिनांक 07.03.2024 रोजी
लाच स्वीकारली -50,000 /- रुपये दिनांक 25.04.2024 रोजी पहिला हप्ता
हश व्हॅल्यू घेण्यात आली आहे
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांची पत्नी ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत. तक्रारदार व त्यांची पत्नी यांनी आलोसे यांची भेट घेऊन त्यांची पत्नी सदस्य असलेल्या वार्डातील विकास कामांना मंजुरी मिळणे करिता अर्ज देऊन त्यांना विनंती केली असता आलोसे यांनी सदर कामाचे अंदाजपत्रकेत 12,00,000/- रुपये किमतीच्या 20 टक्क्याप्रमाणे 2,40,000/- रुपये काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागतील असे सांगितल्याने तक्रारदार यांनी दि 04.03.2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात समक्ष येऊन तक्रार दिली होती. सदर तक्रारीची दि. 07.03.2024 रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांचे कडे तडजोडी अंती 2,00,000/- रुपये लाचेची मागणी करून सदर रक्कमेपैकी 50,000/- रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे मान्य केले होते.आज दि. 25.04.2024 रोजी सापळा आयोजित केला असता आलोसे यांनी तक्रारदार यांचे कडे 2,00,000/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 50,000/- रुपये म्हसदी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतः पंचांसमक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध साक्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी–
मा.श्री.अभिषेक पाटील,
पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
सापळा व तपासी अधिकारी
रूपाली खांडवी
पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे
सापळा पथक
पो. हवा. राजन कदम,
पो.शि. रामदास बारेला, पो. शि. प्रशांत बागुल, चा.पो.शि. बडगुजर
आलोसे यांचे सक्षम अधिकारी
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे