अमळनेर प्रतिनिधी
मंगळ ग्रह सेवा संस्था व समस्त न्हावी मंच मंडळाचा संयुक्तिक उपक्रम.
अमळनेर : येथील नाभिक समाजातील विविध परीक्षांमध्ये नेत्रदिपक यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा न्हावी पंचमंडळातर्फे गुणगौरव सोहळ्यात सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे यासाठी भरीव सहकार्य लाभले.
यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या समाज बांधवांनाही विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले होते.
पू. साने गुरुजी वाचनालय (टाऊनहॉल) येथे झालेल्या कार्यक्रमात नाभिक समाजातील इयत्ता १ ली ते ९ वी (लहान गट), इयत्ता १० वी ते सर्व शाखांमधील पदवी पर्यंत (मोठा गट) च्या विद्यार्थ्यांना ,आदर्श शिक्षक दत्तात्रय सोनवणे, शास्त्रीय संगीत शिक्षक तुषार देवरे, आयटी इंजिनियर भुषण ठाकरे, रेल्वे स्थानक व्यवस्थापक विशाल सोनवणे, उच्चशिक्षित शुभम सुर्यवंशी, आदर्श शिक्षक भगवान सोनवणे, आदर्श शिक्षक सतिलाल बोरसे, अहिराणी गीत-संगीतकार तुषार सैंदाणे, एम .
बी .बी .एस .उत्तीर्ण भावेश बोरसे, संगीत व अभिनय क्षेत्रातील उगवता अभिनेता अक्षर ठाकरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. डिगंबर महाले म्हणाले की ,जो समाज संगठीत असतो, त्याचीच दखल घेतली जाते. स्वत:च्या व्यवसायाला कमी लेखू नका.समाजाला मोठे करायचे असेल तर एकत्र या, संगठीत व्हा.सामुहिक विवाहाची चळवळ राबवा.चांगल्या प्रथांचा पायंडा पाळा .प्रा. नरेंद्र महाले, भगवान चित्ते, किशोर सुर्यवंशी व दिनेश महाले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संपर्क प्रमुख किशोर सुर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोहर खोफ्लडे, महिला प्रदेशाध्यक्षा भारती सोनवणे, जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगारे, युवक प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगारे, धुळे नाभिक मंचाचे भगवान चित्ते, व्याख्याता डॉ. नरेंद्र महाले, पंचमंडळाचे अध्यक्ष कैस सैदाणे, रवींद्र बोरनारे, कायदेशीर सल्लागार ॲड. दिनेश पाटील, शांताराम खोंडे, सुरेश कुंवर, किशोर वाघ, प्रा. विजयसिंग पवार आदी मान्यवर होते. प्रास्तविक दिपक खोंडे तर सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले.