दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे मतदार जनजागृती.

मालेगाव (प्रहार Today वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवार (दि.२०) रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्वच स्तरावरुन मतदान जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. यात मालेगाव येथील दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे सोमवार (दि.१३) रोजी दिव्यागांनी मतदार जनाजागृती फेरी काढली.

येथील मोसमपुल चौकात सर्व दिव्यांगांनी एकत्रित येत मतदार जनजागृती रॅली काढली. बहुउद्देशीय संस्था मालेगाव तसेच प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना मालेगाव आणि अखिल भारतीय दिव्यांग हक्क परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत राऊत त्याचे संस्थेचे सचिव राजेंद्र पवार यांनी सर्व दिव्यांगांना संबोधित केले. मोसमपुल चौकातून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंन्त ही जनजागृती रॅली काढण्यात आली.

यावेळी दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे मतदार जनजागृती रॅलीत निंबा अहिरे, मयूर पाटील, सुनीता राऊत, राहुल पगार, संदीप कदम, योगेश सोळुंके, कविता शेंगदाणे, अश्विनी मार्तंड, निशा कोतवाल, खालीद बाबा, संजयकुमार अहिरे, संतोष ठाकरे, देविदास पवार, तेजस चौधरी, भारती जाधव, शोभाबाई गवळी आदींसह सर्व दिव्यांग मोठ्यासंख्येने उपस्थित होते. या रॅलीत सहभागी सर्व दिव्यांगांना संस्थेतर्फे चहापाणीसह अल्पपोहार वाटप करण्यात आला. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी यांना जनजागृती संदर्भात पत्र देण्यात आले.

शहर व परिसरातील प्रत्येक दिव्यांगांना मतदानासाठी सुलभता निर्माण करुन द्यावी, दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंन्त कशाप्रकारे पोहचविता येईल, याची काळजी घ्यावी, मतदानासाठी दिव्यांगांना खास सोय उपलब्ध करुन द्यावी, तसे प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन यांप्रसंगी करण्यात आले.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!