उष्माघाताने सात्री येथील तरुणाचा घेतला बळी: अमळनेर तालुक्यातील घटना.

अमळनेर (प्रहार Today वृत्तसेवा): अमळनेर तालुक्यातील मौजे सात्री येथील रहिवाशी ४७ वर्षीय इसमाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिनांक १० मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी मारवड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शाम हिरकण भिल वय ४७ रा. सात्री ता. अमळनेर असे या मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील सात्री गावात शाम भिल हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह भागवत होते. दिनांक १० मे रोजी शाम भिल हे शेतात कामावर गेले होते. सायंकाळी ते कामावरून घरी आलेच नाही. म्हणून त्यांची आई व मुलगा यांनी शाम भिल यांचा शोध घेतला असता, बोरी नदीच्या काठावरील सोमनाथ पाटील यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या गाडी रस्त्यावर बेशुध्द अवस्थेत आढळून आले. त्यांना खासगी वाहनातून अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी सदर इसमास उष्माघातामुळे मयत झाले असल्याचे घोषीत केले. त्यानंतर मारवड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास श्री.मुकेश साळुंखे हे करीत आहे.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!
नमस्कार!
आम्ही आपली काही मदत करू शकतो?