अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर:- येथे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली सकाळी 8.00 वाजता ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ स्वच्छता अभियान परियोजनेच्या द्वितिय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छठ घाट, आई. टी. ओ, दिल्ली येथून करण्यात आला.या प्रकल्पांतर्गत संत निरंकारी मिशनच्या
अमळनेर शाखे तर्फ़े शहरातील अती प्राचीन मंगळ ग्रह मंदिर परिसरातील तलावाची साफ-सफाई मिशनच्या अनुयाईतर्फ़े आज
करण्यात आला. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणूकीतून प्रेरित अशी ही परियोजना भारताच्या 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 1533 ठिकाणी 11 लाखाहून अधिक स्वयंसेवकांच्या सहभागाद्वारे विशाल रुपात यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली.
संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने बाबा हरदेवसिंहजी यांच्या विपुल शिकवणूकीतून प्रेरणा घेत या “प्रोजेक्ट अमृत”वे आयोजन करण्यात आले. यावर्षी स्वच्छ जल, स्वच्छ मन या मुलभूत संदेशातून या परियोजनेने एक जनजागृतीचे रूप धारण केले. या प्रसंगी संत निरंकारी मिशनचे समस्त अधिकारीगण मान्यवर अतिथि तसेच शेकडो च्या संख्येने स्वयंसेवक व सेवादलचे सदस्य सहभागी झाले.
संत निरंकारी मंडळ अमळनेरचे सेवादल इंचार्ज जितू डिंगराई यांनी विस्तृत माहिती देताना
सांगितले, की ‘प्रोजेक्ट अमृत’ दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक नियमांचे उचित पालन करण्यात आले. या परियोजनेमध्ये जास्तीत जास्त युवावर्गाचे सक्रिय योगदान राहिले. डिंगराई यांनी सूचित केले, की ही मोहिम केवळ एक दिवसांची न राहता यापुढे दरमहा वेगवेगळे घाट व जलस्रोतांची स्वच्छता निरंतर होत राहील.
कार्यक्रमाचे समापन झाल्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थान अमळनेर यांच्या वतीने निरंकारी सेवादल,प्रचारक, सहभागी सर्व संत बंधू बघिणी यांना चहा नास्ता ची व्यवस्था करून देत आभार व्यक्त केले सहभागी झालेल्या अतिथीगणांनी मिशनची अत्यधिक प्रशंसा केली आणि निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी यांचे हृदयापासून आभार व्यक्त करुन सांगितले, की या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून मिशनने जल संरक्षण व जल स्वच्छतेच्या दिशेने, प्रकृती रक्षणार्थ निश्चितपणे एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.