प्रताप महाविद्यालयातील भूगोल विभागाकडून मध्ये प्रदेश येथे शिव जयंती उत्सव साजरा करण्यात आली.

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर : – येथे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आता पचमढी मध्य प्रदेश येउन आलेले विद्यार्थीनी देखील शिव जयंती उत्सवात साजरा केली. प्रताप महाविद्यालयातील भूगोल विभागाची सहा दिवसीय भौगोलिक सहल पचमढी गेलेली असताना आपल्या महाराष्ट्राची रूढी परंपरा जाणीव ठेवत. 19 फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती पचमढी येथे अगदी धुमधडाक्यात साजरी करण्यात आली . त्याप्रसंगी पचमढी मध्य प्रदेश येथील अनेक रहिवासी यांनी सुद्धा जयंतीत उत्साहाने सहभाग घेतला. प्रताप महाविद्यालयातील भूगोल विभागाचे डॉ. प्रमोद चौधरी सर, डॉ. महाजन सर, डॉ. राखी घरटे मॅडम, जयदेव पाटिल प्रतिभा पाटील भूगोल विभाग मंडळ अध्यक्ष दर्शन पाटिल यांच्या मार्गदर्शनाने जयंती साजरी केली.भूगोल विभागातील विद्यार्थी जयेश पाटील, तुषार पाटील ,सुरेखा माडी, प्रतीक्षा पाटील, प्रियंका पाटील, मयूर पाटील, व आदी विद्यार्थ्यांनी उत्साहात उपस्थित होते. महाराजांची जयंती अतिशय उत्सवात साजरी करण्यात आली. व मध्ये प्रदेशातून रहिवासी यांनी देखील कौतुक केला. त्यावेळी सुमित, साहू,तसेच इतर स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!