शौचालय घोटाळा प्रकरणी तत्का.ग्रामसेवक शेवटी निलंबित.


भडगांव (प्रहार Today वृत्तसेवा) पळासखेडे ग्रा.पं.येथील २४ लाख ८४ हजार शौचालय घोटाळा प्रकरणी भडगाव पो.स्टे येथे दि.२५/१/२०२४ रोजी CR.20/2024 अन्वये, गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात तत्कालीन ग्रामसेवक जिभाऊ सुकदेव पाटील यांना गुंन्हात भडगांव पोलीसांनी अटक करून, दि.२१/२/२०२४ पासून ८ दिवसाची पोलीस कोठडी व न्यांयालयीन कोठडी देण्यात आली होती. त्या अनुषंगाने सदर शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना ४८ घंटे जेल तुरुंगात ठेवण्यात आले नंतर सेवेतून निलंबित करण्याबाबत शासन निर्णयात तशी तरतूद आहे.

त्यानुसार जिभाऊ पाटील यांना सेवेतून तीन महिने पासून निलंबित केले नव्हते. याप्रकरणी तक्रारदार विजय दोधा पाटील सा.कार्यकर्ते यांनी जि.प.सीईओ अंकीत साहेब व डेप्युटी सिईओ अनिकेत पाटील यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्या संदर्भात दि.१६/५/२०२४. रोजी जिभाऊ पाटील यांना जिल्हा परिषद सीईओ यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चोपडा पंचायत समीती येथे निलंबन कारवाई करून, चोपडा येथील मुख्यालयी हजर राहणे बाबत आदेश करण्यात आले आहेत.


सदर शौचालय गुन्ह्यांचा तपास वैयक्तिक बोगस लाभार्थी २०८ व मयत ३५ लाभार्थी च्या नावावर टाकून अपहारीत रंक्कम वसुलीची कारवाई व पंचायत समीती चे सहभागी भ्रष्ट अधिकारी सह ईतरांना सह आरोपी करण्याची मागणी विजय पाटील यांनी तपाशी पो.अधिकारी श्री पालकर पोलिस उपनिरीक्षक यांचेकडे कारवाई ची मागणी केली आहे.

सखोल चौकशी व अपहाराची रंक्कम वसुली केल्या शिवाय चार्ज सीट न्यायालयात सादर करण्यात येऊ नये. अशी ही मागणी मूळ तक्रारदार श्री.विजय दोधा पाटील यांनी केली आहे.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!