बनावट दस्तऐवज व कर वसुली नसतांना दिलेला आदर्श ग्रामसेवक पुरस्कार रद्द करा. योगेश पवार यांची तक्रार.

(प्रहार Today वृत्तसेवा ) मागील काही दिवसांपूर्वी गृप ग्रामपंचायत कोळंबा ता.चोपडा येथील सन २०१४-१५ चा बनावट दस्तएैवजांचा वापर करून, सर्व नियम धाब्यावर ठेवत फसवणुकीने श्री.दिपक मोरेश्वर जोशी यांनी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला असता, सदर प्रकरणाच्या तळाशी जावून, माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती प्राप्त करून, योगेश पवार यांनी पुराव्यासह जिल्हा परिषद ते मंत्रालय पर्यंत ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: पीआरसी १०७६/२३३५/२३, मंत्रालय, मुंबई, दि.३१ जानेवारी १९७७ यातील शिफारस क्रमांक १.५ वर शासनाने विचार करून असा निर्णय घेतला आहे की, दरवर्षी ७० टक्के ग्रामपंचायत कराची वसुली करण्यासाठी कारवाई न करणाऱ्या व सहकार्य न देणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचांविरुध्द कारवाई करण्यात यावी. व दरवर्षी ७० टक्के कराची वसुली होईल, अशी उपाययोजना आखण्यात यावी. असे असतांना, गृप ग्रा.पं. कोळंबा ता.चोपडा जि.जळगांव येथील करवसुली संदर्भात प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता, सन २०१४-१५ मध्ये एकूण कराची मागणी र.रु.६,४३,२६७/- असून प्रत्यक्ष वसुली र.रु.३,०३,४८०/- इतकी झालेली आहे.

म्हणजेच २०१४-१५ मध्ये एकूण ४७.१७ टक्के वसुली झालेली आहे.

दि.०५/०२/२०२४ रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन यांचेकडून प्राप्त अहवालानुसार श्री.दिपक मोरेश्वर जोशी यांना त्यांच्या कार्यालयाकडून कुठलाही चारित्र्य पडताळणी दाखला दिलेला नसल्याने, त्यांनी बनावट दाखला तयार करून, तालुका व जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त करून घेतलेला आहे. त्यानुसार त्यांना दरवर्षी एक वेतनवाढ आगाऊ अदा केली जात आहे. त्यानुसार वरील वस्तुस्थितीचा विचार करून, सदरचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार तात्काळ रद्दबातल करण्यात यावा. व दिलेली आगाऊ वेतनवाढ नुसारची संपूर्ण रक्कम वसूल करण्यात यावी.

तसेच सन २०१४-१५ मधील गृप ग्रा.पं. कोळंबा ता.चोपडा येथील तत्कालीन ग्रामसेवक श्री.दिपक मोरेश्वर जोशी यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२९ नुसार ग्रामपंचायत कराची वसुलीसाठी कारवाई केलेली नसल्याने, त्यांचे विरुध्द महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तवणूक) नियम १९६७ व महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही / कारवाई करण्यात यावी. अशी तक्रार योगेश पवार यांनी पुराव्यासह ऑनलाईन दाखल केली आहे.

फसवणुकीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार घेणाऱ्या ग्रामसेवकांचे घेतलेले आगाऊ वेतनवाढ बंद होईल. यामुळे पुन्हा एकदा ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे. क्रमश:….

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!