अमळनेर प्रतिसाद
हायब्रीड अँम्युनीटी अंतर्गत दोन मोठ्या रस्त्यांना मंजुरी, पारोळा अमळनेर ते जळोद आणि जानवे- बहादरपूर-पारोळा रस्त्याचा समावेश.
अमळनेर-मतदारसंघात भरभरून विकास कामे आणणारे मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा निधी आणण्याचा ओघ अजूनही थांबत नसुन मार्चच्या सुरवातीलाच त्यांनी मोठा धडाका दाखवीत 312 कोटींच्या दोन मोठ्या आणि अतिशय महत्वपूर्ण रस्त्यांची भेट अमळनेर मतदारसंघास दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
न भूतो न भविष्यती अशीच हे भेट मानली जात असून एकंदरीत नवीन रस्त्यांची मालिकाच मंत्री पाटील यांनी शहर व ग्रामिण भागात सुरू केल्याने मतदारसंघास नवे रूप प्राप्त होत आहे.महाराष्ट्र शासन बांधकाम विभागाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंडळ जळगाव अंतर्गत हायब्रीड अँम्युनीटी भाग 2 अंतर्गत अमळनेर मतदारसंघात 57 किमीच्या दोन मोठ्या रस्त्यांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली असून यात पारोळा अमळनेर ते जळोद आणि जानवे- बहादरपूर-पारोळा रस्त्याचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.सदरचे रस्ते नव्या धोरणानुसार ट्रीमिक्स काँक्रीटीकरणचे होणार असल्याने अनेक वर्षांसाठी हे रस्ते वरदान ठरणार आहेत.विशेष म्हणजे परिसरातील दोन राज्य,अनेक तालुके व अनेक गावांना जोडणारे हे रस्ते होणार आहेत.
जळोद ते अमळनेर पारोळा 206 कोटींचा रस्ता आमलाड मोड बोरद तऱ्हाडी शहादा सांगवी हातेड अमळनेर पारोळा रस्ता राज्य मार्ग क्रमांक 1 किमी 149.570 ते 182.200 ची रुंदीकरणसह सुधारणा करणे या 32.630 किमीच्या रस्त्यासाठी 206.32 कोटी निधी मंजूर झाला असून सदर राज्य मार्गावर पारोळा ते अमळनेर आणि अमळनेर ते जळोद या दरम्यान रस्ता काँक्रीटीकरण होणार आहे,विशेष म्हणजे हा 2 पदरी रस्ता होणार असून यात रस्त्याची रुंदी वाढून सर्व जुने पूल नवीन व मोठे होणार आहेत.सदर रस्ता महाराष्ट्रातील चोपडा व शिरपूर या तालुक्यांना पर्यायी मार्ग तसेच मध्यप्रदेश महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे,तसेच आदिवासी बांधवाना मुख्य प्रवाहाशी जोडणारा अत्यंत महत्वाचा हा रस्ता असून अमळनेर मतदारसंघातील जळोद, अमळगाव, गांधली, अमळनेर, सडावन, रत्नापिंप्री, पारोळा या गावांमधून हा रस्ता जाणार आहे.
106 कोटींचा जानवे, बहादरपूर पारोळा रास्तावावडे,जानवे,बहादरपूर, पारोळा, कासोदा रोड प्राजीमा 46 कि मी 14/00 ते 8/00 या मार्गावर जानवे ते बहादरपूर-पारोळा दरम्यान सुधारणा करणे तथा काँक्रीटीकरण करणे या 25 किमीच्या रस्त्यासाठी 106.06 कोटी निधी मंजूर झाला असून रस्त्याची रुंदी साडे पाच मीटर असणार आहे.एकप्रकारे शॉर्टकट् असलेल्या या मार्गाला नवे रूप व नवी झळाळी मिळाली असून जानवे, कावपिंप्री, सुमठाणे, इंधवे, जीराळी, बहादरपूर, महाळपूर, शेवगे, बोदर्ड, पारोळा या गावामधून जाणारा हा रस्ता असून ग्रामिण जनतेसाठी हा रस्ता वरदान ठरणार आहे. सदर रस्त्यांची टेंडर प्रोसेस देखील झाली असुन लोकसभा निवडणुकीनंतर या रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. सदर रस्त्यांच्या मंजुरीबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना अजित पवार, ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन, पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
विकासकामांची इतिहासात होणार नोंद अमळनेर मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने एवढ्या मोठ्या प्रमाणात कोटीच्या कोटी निधी येत असल्याने याची नक्कीच इतिहासात नोंद होणार आहे, मतदारसंघातील जनतेला राजकीय हेवेदावे, टीका टिपण्णी, आरोप प्रतिरोप यात मुळीच इंटरेस्ट नसून त्यांना फक्त विकास हवा आहे आणि जो लोकप्रतिनिधी विकास करेल त्याला जनता डोक्यावर घेतल्या शिवाय राहणार नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही. आज सर्व रस्ते नवीन होत असताना व बहुसंख्य विकास कामांसाठी मोठा निधी येत असताना जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे,मात्र नौटंकी करणाऱ्या लोकांना हेच पोटात दुखत असल्याने ते नेहमीच कोणत्याना कोणत्या मार्गाने मंत्री महोदयांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत असून मंत्री मात्र याकडे दुर्लक्ष करीत जनसेवा आणि विकासकामे आणण्यात व्यस्त असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
भागवत पाटील
तालुकाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमळनेर
माईल्ड स्टोनचा एक एक टप्पा सरकतोय पुढे मंत्री अनिल पाटील हे मतदारसंघात आणत असलेली उल्लेखनीय विकासकामे मतदारसंघासाठी जणूकाही माईल्ड स्टोन ठरत असून याचा एक एक टप्पा पुढे पुढे सरकत असल्याने विकासाची गती वाढुन मतदारसंघाचे रूप बदलत आहे.