अमळनेर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास मिळाली प्रशासकीय मान्यता-मंत्री अनिल पाटील.

अमळनेर प्रतिनिधी

10 कोटी निधीतून डाक बंगल्याच्या जागेत उभी राहणार नवी भव्य इमारत.

अमळनेर :- येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून 10 कोटी निधीतून जि प विश्रामगृह येथे असलेल्या डाक बंगल्याच्या जागेत नवी भव्य इमारत उभी राहणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
यासंदर्भात महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचे शासन आदेश दि 7 मार्च रोजी काढण्यात आले असुन या निर्णयाने ग्रामिण जनतेसाठी पंचायत समितीची नवीन सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत उपलब्ध होऊन शहराच्या वैभवात देखील भर पडणार आहे.सदर मंजुरिसाठी मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा अथक प्रयत्न केले होते,जिल्हा परिषद जळगाव च्या माध्यमातून राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर झाला होता, अखेर मंत्री पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याने मार्च एडींग चे मोठे गिफ्ट अमळनेर तालुक्यास मिळाले आहे.

जुन्या इमारतीस झाले 54 वर्ष अमळनेर पंचायत समितीची प्रशासकीय इमारत सन १९६१ साली बांधण्यात आली असून आजमितीपर्यंत सदर इमारतीस ५४ वर्ष पूर्ण झाली आहेत. सदर इमारत हि जुनी व जीर्ण झालेली असल्याने प्रशासकीय कामकाज करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.सद्यस्थितीत पंचयात समितीचे प्रशासकीय कामकाज जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये चालु आहे. सदर इमारत हि जुनी व जीर्ण झालेली असल्याने पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी तसेच अभ्यागतांसाठी प्रशासकीय कामकाजासाठी जागा अपुरी पडत असून त्याचा परिणाम कामावर पडत आहे.त्यामुळेच मंत्री अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव सादर झाला होता.

डाक बंगल्याचा जागेत होणार इमारत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम नगर भूमापन क्रमांक ३५२५ ते ३५३१(डाक बंगला) या क्षेत्रावर करण्यात येणार आहे. सदर जागा ही पंचायत समिती, जिल्हा परिषद, जळगांव यांच्या ताब्यात आहे. बांधकामाचे एकुण क्षेत्रफळ २१४१.८४ चौ. मी. इतके प्रस्तावित केले आहे.

सर्वच कार्यालयाच्या इमारती होत आहेत नवीन,,, मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अमळनेर शहर व मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलत असून विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी मतदारसंघात येत आहे,याआधी महसूल विभागाच्या प्रशासकीय इमारतीसाठी(प्रांत व तहसील कार्यालय)यासाठी मंत्री पाटील यांनी 11 कोटी निधी मंजूर करून आणल्याने त्याचे व 14 कोटी निधीतून अजून एका स्वतंत्र प्रशासकीय इमारतीचे बांधकाम जुन्या पोलीस लाईनीच्या जागेत जोमाने सुरू असून प्रगतीपथावर आहे,नुकताच नवीन बस स्थानकासाठीही 8 कोटींचा निधी मंजूर होऊन प्रशासकीय मान्यता मिळाली आहे,याशिवाय अमळनेर ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले असून 8 कोटी निधीतुन नवीन इमारतीचे बांधकाम देखील सुरू झाले आहे.आता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीलाही 10 कोटींची मान्यता आणल्याने काही दिवसात सर्व शासकीय कार्यालये नव्या इमारतीत थाटली जाणार असल्याने मंत्री पाटील यांचे कौतुक होत आहे. सदर मंजुरी बद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस व ना अजित पवार,ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन व पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!