अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील ढेकुसीम माझे प्रेमाचे गाव-मंत्री गुलाबराव पाटील
पाडळसरे प्रकल्पाला लवकरच मिळणार केंद्रीय जलआयोगाची मान्यता-मंत्री अनिल पाटील.
अमळनेर-या संपूर्ण तालुक्याशी माझी जवळीक असली तरी काही गावे माझ्या अंत्यत प्रेमाची व जिव्हाळ्याची असून यात ढेकुसीम गावाचाही समावेश असल्याने याठिकाणी मी मनापासून विकासकामे देत असतो अशी भावना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ढेकुसिम येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली.
तर निम्न तापी पाडळसरे प्रकल्पाला राज्य शासनाकडून सुप्रमा मिळाल्यानतंर पुढील केंद्राचा प्रवासही जोमाने सुरू झाला असून लवकरच केंद्रीय जलआयोगाची मान्यता या प्रकल्पाला मिळेल आणि त्यानंतर निधीसाठी केंद्रीय योजनेत प्रकल्पाचा समावेश होईल असे शुभसंकेत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी जाहीरपणे दिले.ढेकू सिम येथे आयोजित या सोहळ्यात
सभामंडप बांधणे 15 लक्ष,अभ्यासिका बांधणे 15 लक्ष,गावअंतर्गत काँक्रीटीकरण करणे 10 लक्ष,स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे 10 लक्ष आदी कामांचे भूमीपूजन व लोकार्पण दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.दोन्ही मंत्र्यांचे गावात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की ढेकू गावाला विकासकामांसाठी मी पैसा कमी पडू देणार नसून बाहेरगावी गेलेले लोक गावात आल्यानंतर तोंडात बोटे घालतील असे चित्र निर्माण करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.सरपंच सौ सुरेखा प्रविण पाटील,उपसरपंच जाधवराव पाटील यासह सदस्यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
पांझराचे पाणी आणणार माळन मध्ये मंत्री अनिल पाटील पुढे बोलताना म्हणाले की
चार वर्षात ढेकू गावाचा कायापालट झाला असुन भविष्यात पांझरा नदी लचे पाणी माळन मध्ये टाकायचा प्रयत्न आहे तो प्रयोग यशस्वी झाल्यास ढेकूसीम सह या संपूर्ण परीसरातील गावांना योजनांची गरज राहणार नाही व पाणीटंचाई कधी भासणार नाही असे त्यांनी सांगितले व नामदार गुलाबराव पाटील म्हणजे दूरदृष्टीचे पालकमंत्री असल्याचे सांगत त्यांचे कौतुकही केले.
माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी फक्त बोलणे महत्वाचे नसून कृती महत्वाची असल्याचे सांगत पाणीपुरवठा मंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्याला पाणी पाजण्याचे काम गुलाबभाऊ च्या माध्यमातून होत असून महायुती शासनाच्या माध्यमातून शाश्वत विकास होत असल्याचे सांगितले.
यावेळी मंचावर निवृत्त डीवायएसपी कैलास पाटील,
सेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार,शहर प्रमुख संजय पाटील,माजी सरपंच सुरेश अर्जुन पाटील,माजी नगरसेवक राजू फाफोरेकर,जितेंद्र पाटील,सरपंच सौ सुरेखा प्रविण पाटील,उपसरपंच जाधवराव पाटील,मेजर प्रविण पाटील,ग्रा प सदस्य बेबाबाई पाटील,मंगल पाटील,सीमा पाटील,सुरेखा भिल,मनीषा सोनवणे,नामदेव पाटील,भूषण पाटील,राजेंद्र गायकवाड यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार रविंद्र घमश्याम पाटील व उमेश पाटील यांनी मानले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.