घनश्याम पाटील व सागर मोरे यांच्या प्रयत्नांना यश.
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर :- तालुक्यातील पातोंडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाल्यानंतर शासनाने कोट्यवधी रुपये मंजूर करून भव्य असे नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून दिमाखात उभी केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सदर प्राथमिक आरोग्य केंद्र उदघाटनाच्या प्रतिक्षेत देखील असून त्याच प्राथमिक आरोग्य केंद्राचा 30 खाटामध्यें ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव देखील शासन दरबारी अडकून पडला होता. येथील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील त्याचा सतत स्व-खर्चाने जिल्हास्तर, विभागीय स्तर, मंत्रालयात पाठपुरावा करत होते आणि 30 जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अखेर शासनाने पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेऊन मंजुरी दिली. या निर्णयाने पातोंडा सह परिसरातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधाप्राप्त होणार असून तालुक्यावर जाण्याची रुग्णांची फरफट यामुळे थांबणार आहे.
पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 8 उपकेंद्रे आहेत. त्यात एकूण 34 गावांचा समावेश असून जवळपास सत्तर हजार पेक्षा जास्त लोकांना आरोग्य सेवेचा लाभ ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून होत असतो. मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता, चांगल्या आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी तालुका पातळीवर रात्री अपरात्री होणारी रुग्णांची घालमेल थांबविण्यासाठी व आधुनिक यंत्रासह स्थानिक पातळीवर योग्य त्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याची मागणी पातोंडासह परिसरातील नागरिकांमधून सातत्याने होत होती. येथील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील व सागर मोरे हे ह्या प्रकरणात स्वतः व्यक्तिक्ष लक्ष घालून स्वखर्चाने जिल्ह्यापासून, विभागीय व मंत्रालयापर्यंत पाठवपुरावा करत होते. अनेक ठिकाणी त्यांना विविध अडचणी येत होत्या. त्यासाठी त्यांनी त्रुटींची पूर्तता करून आरोग्य भवनात व मंत्रालयात सचिवांच्या व मंत्र्यांच्या दालनात सदर विषय मार्गी लावण्यासाठी पराकाष्ठा करत होते. त्यासाठी त्यांना जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, भाजपाचे पदाधिकारी व्ही.आर.पाटील यांचे सहकार्य लाभले. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर बाविस्कर तसेच जिल्हा, विभागीय व मंत्रालयातील अधिकारी वर्गांने देखील या कामाला तत्परता दाखवत मदत केली. तत्पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत खूप वर्षांपासून जीर्ण होती. नवीन इमारतीचे बांधकाम स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे गेल्या पंधरा वर्षापासून रखडलेले होते. मात्र घनश्याम पाटील यांनी केलेल्या योग्य त्या पाठपुराव्यामुळे मंत्री गिरीश महाजन व माजी विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांच्या सहकार्यामूळे साडे चार कोटी रुपयांची नवीन वास्तूचे बांधकाम रुग्णसेवेसाठी आज रोजी उपलब्ध झालेली आहे. आरोग्य केंद्राची रोजची बाह्यरुग्ण संख्या दिडशेच्या आसपास असून बाह्यरुग्ण, मानव विकास कार्यक्रम, प्रसूती, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी व इतर अनेक शिबिरे आयोजित केली जातात त्यातून गरजू रुग्णांना तत्परतेने या सुविधांचा लाभ होतो.सद्यस्थितीत आरोग्य सेवा देत असलेली इमारत जिर्ण असल्याने आरोग्य सुविधेत अडचणीना सामोरे जावे लागत होते.आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील आपला जीव मुठीत घेऊन कामकाज सांभाळावे लागत होते.मागील काळात इमारतीत पाण्याच्या गळती मुळे पाणी शिरल्याने आरोग्य सेवेच्या मशिनरी नादुरुस्त झाल्या आहेत.पातोंडा हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असून पंचक्रोशीतील मुख्य बाजारपेठ,पोलीस स्टेशन,राष्ट्रीय बँक,जिल्हा मध्यवर्ती बँक तथा सर्व शासकीय कार्यालये आणि विशेषतः गावाला लागून राज्य महामार्ग क्रमांक सहा व चौदा लागून असल्याने सतत अपघात होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे.यामुळे पातोंडा प्रा. आरोग्य केंद्रात अपघाती रुग्ण संख्या देखील अधिक येत असतात, मात्र प्रा.आरोग्य केंद्रात उपचार प्राथमिक स्वरूपात असल्याने बऱ्याच वेळेस अपघाती रुग्णांवर तात्काळ योग्य उपचार करता येत नाही परिणामी गंभीर परिस्थितीत जखमींचा प्राण वाचवण्यात अपयश येऊ शकते.तसेच कोविड 19 काळात सर्व सेवा ठप्प झाल्या तरी देखील एकमेव आरोग्य सेवा नागरिकांना आधार वाटत होती.त्यामुळे ग्रामीण भागात देखील वैद्यकीय चांगल्या सुविधा निर्माण होऊन मिळाव्यात म्हणून परिसरातील नागरिकांची पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन होऊन ग्रामीण रुग्णालयात रूपांतरित करण्याची मागणी होती त्या अनुषंगाने शासनाने त्याला विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालय श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेऊन मंजुरी दिली. ग्रामीण भागात शेतकरी व मजूर वर्ग असल्याने मिळकतीचे साधन हवं त्याप्रमाणात नाही, खाजगी महागड्या वैद्यकीय सेवा घेणं सामान्य नागरिकांना परवडत नाही,ह्यामुळे गोरगरीब जनतेचा भ्रमनिरास होत असतो हे लक्षात घेता तत्कालीन माजी सरपंच रेखा मोरे, माजी पं.स. सभापती रेखा पाटील,जि.प .सदस्या मीना पाटील,माजी आमदार स्मिता वाघ,मा. जि.प.सदस्य व्ही.आर.पाटील,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोळे,सहाय्यक निय अधिकारी सुधाकर बाविस्कर यांच्या माध्यमातून ग्राम पंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषदेत आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचे ठराव झाले होते.पुढे त्याचा योग्य तो पाठपुरावा घनश्याम पाटील व सागर मोरे यांनी करून तयांचया प्रयत्नांची दखल शासनाने घेऊन पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी दिली.
फ़ोटो