अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर :- तालुका येथे सरपंच, उपसरपंच व सन्माननीय सदस्यांचा तालुकास्तरीय मेळावा तसेच नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ मराठा मंगल कार्यालय अमळनेर येथे संपन्न झाला .नमूद मेळाव्याचे उदघाटन मा. नामदार अनिल दादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले .नमूद कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी दत्ताभाऊ काकडे ,प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद मुंबई हे होते.तर माजी आमदार शिरीष दादा चौधरी ,राज्य कोर कमिटीची सदस्य आबासाहेब सोनवणे, राज्य कमिटीचे प्रमुख जे डी टेमगिरे साहेब, नाशिक विभागीय अध्यक्ष राजमल भागवत ,उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्ष सौ सुषमाताई देसले पाटील ,जिल्हाध्यक्ष बाळूभाऊ धुमाळ, श्रीकांत पाटील जिल्हा समन्वयक ,सुरेशतात्या पाटील कार्याध्यक्ष एनसीपी अमळनेर,नितीन पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हिरालाल पाटील संचालक बाजार समिती यांचे प्रमुख उपस्थितीत झाला.मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरपंच यांचे अधिकार अत्यंत मौलिक व महत्त्वाचे आहेत .व खऱ्या अर्थाने ग्रामविकास चक्र सरपंच यांचेच हातात असते,असे नमूद केले.तसेच सरपंच परिषद च्या माध्यमातून सर्व सरपंच उपसरपंच तसेच महिला सदस्यांना अधिक सक्षम करून त्याना योग्य ती मदत पुरविण्यात येत असते .नमूद सरपंच परिषदेच्या मेळाव्याचे आयोजन विभागीय अध्यक्ष सौ सुषमाताई देसले पाटील यांचे मार्गदर्शनात अमळनेर तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे, जिल्हा समन्वयक चंद्रकांत पाटील, सौ कल्याणी पाटील,महिला तालुका अध्यक्ष सौ शितल पाटील यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन महेंद्र पाटील यांनी केले.नमूदप्रसंगी नवीन पदाधिकारी याना नियुक्ती पत्र ही देण्यात आले . नमूद मेळाव्यास सरपंच उपसरपंच सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.