आधार संस्थेच्या वतीने स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिलांसाठी ॲडव्हान्स शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी :- अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था,  यांचेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील गरजू महिलांसाठी वर्ष भरात विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात आले, त्या अंतर्गतच ज्या महिला घरी शिवणकाम करतात त्यांच्याकरिता ॲडव्हान्स शिवणकाम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले ज्याकरिता, १२ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात बचत गटातील ६७ गरजू महिलांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले, या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना विविध प्रकारचे डिझाईन ब्लाऊज, वधू मुलीचे आकर्षक ब्लाऊज, फॅन्सी ड्रेस, असे विविध प्रकार शिकवण्यात आले. ज्याचा महिलांना खूप उपयोग झाला या प्रशिक्षण, कार्यक्रम सांगता प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून माजी मुख्य प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीमती तिलोत्तमाताई पाटील  उपस्थित होत्या, त्यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना उद्योग व्यवसाय विषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती देत मार्गदर्शनही केले.

त्याचप्रमाणे सिमा रगडे, तालुका सन्वयक उमेद अभियान यांनी बचत गटातील महिलांनी आपल्या गरजा नुसार प्रशिक्षण घेऊन नव नवीन उद्योजक व्यवसाय सुरू करावा यावर मार्गदर्शन केले, ज्योती भावसार, तालुका सम्वयक उमेद अभियान यांनी महिलांनी प्रशिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य करावे व कुटुंबाला आधार साठी आपले कार्य करावे यावर माहिती दिली, डॉ. भारती पाटील, अध्यक्ष आधार संस्था, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व महिलांसोबत चर्चा केली . तसेच श्रीमती रेणू प्रसाद, आधार संस्था कार्यकारी संचालक, यांनी महिलांशी संवाद साधून नवीन डिझाईन बनवलेले ब्लाऊज व ड्रेस यांची पाहणी केली. सदर शिवण क्लास प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून चैताली साळुंखे फॅशन डिझायनर मारवड या उपस्थित होत्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच आधार संस्थेचे प्रकल्प समन्वयक, मुरलीधर बिरारी यांनी सूत्रसंचालन केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिभा पाटील, निशिगंधा पाटील, तेजस पाटकरी यांनी काम पाहिले.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!