जैन समाजाच्या वास्तूत प्रताप हायस्कुल मध्ये रंगली चक्क मटण पार्टी.!

प्रतिनिधी: अमळनेर
पूज्य सानेगुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखली जाणारी अमळनेर मधील प्रताप हायस्कुल ही संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे. शिक्षणाच्या पवित्र कार्यासाठी जैन समाजाने सदर जागा (वास्तू ) ही दान केलेली आहे. मागील काही दिवसांपूर्वी प्रताप कॉलेज येथील मैदानात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चालू होते त्यात महाराष्ट्राची नामवंत कलावंत यांनी आपली उपस्थिती लावली परंतु जळगांव जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी श्रीमती डॉ.किरण कुंवर यांनी त्यांच्या पती सोबत साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात उपस्थिती दिली असता, प्रताप हायस्कूलची मुख्याध्यापिका श्रीमती प्रमोदींनी बळीराम कोळी यांनी डॉ.किरण कुंवर व त्यांचे पती यांना जैन समाजाच्या पवित्र वास्तूमध्येच चक्क मटणाची पार्टी देऊन जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत जैन समाजाच्या वतीने श्रीमती प्रमोदींनी कोळी यांचेवर कारवाईची संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल शिंदे यांचे कडे लेखी स्वरूपात मागणी केली आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार जैन समाजातील काही नामवंत व्यक्तींनी शिक्षणाधिकारी डॉ.किरण कुंवर यांना या बाबत जाब विचारला असता, त्यांनी सदर घटना घडल्याची कबुली दिली असल्याचे सांगितले जात आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मधील कारवाई थांबविण्यासाठी सदर पार्टी दिली असावी अशी चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे. जैन समाजाच्या पवित्र वास्तूमध्ये असे कृत्य करून, जनाची नाही पण मनाची देखील लाज न वाटणाऱ्या मुख्याध्यापिका यांच्यावर निलंबनाची कारवाई तात्काळ करावी अशी मागणी जोर धरीत आहे.

शिवाय जळगांवच्या प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ.किरण कुंवर यांना बहाल असलेली डॉक्टर ही पदवी कशी? मिळाली व सदर पदावर नियुक्तिने कसे पोहोचले याबाबत त्यांच्या लायकी संदर्भात देखील साशंकता निर्माण होत आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाच्या भोवऱ्यात असलेल्या प्रमोदींनी कोळी यांनी या बाबत मुक्याची भूमिका घेतली असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
क्रमशः…

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!