अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर :- याबाबत माहिती अशी की दिनांक 09/02/2024 रोजी अमळनेर नगर परिषद अग्निशामक विभागातील वरीष्ठ अधिकारी त्यांच्या ऑफिसात बसून दारू पीत असताना दिसत आहे. त्या विभागा प्रमुख मस्त दारूची मजा करत होते,जसे की पूर्ण नगर परिषद मध्ये त्यांचे कोणी काहीही करून घेत नाहीत . मुख्याधिकारी साहेबांना देखील न घाबरता हुकूम शाहि करत दिसून येत आहे. दारू नेहमी प्रमाणे पीत असतात एका तरुणाने व्हिडिओ त्याच्या मोबाईल मध्ये कैद केला.
त्या तरुणाने अग्निशमक प्रमुख व्हिडिओ मध्ये दारू पितांना दिसत आहे.हे मुख्याधिकारी साहेबांच्या दालनात जाऊन मुख्याधिकारी साहेबांना निदर्शनात आणून दिले की साहेब आपले विभाग प्रमुख विभागात बसून दारू पीत आहेत . व घडलेल्या प्रकाराबाबतची व्हिडिओ क्लिप मुख्याधिकारी साहेबांना दाखवली असता तरी मुख्यअधिकारी साहेब यांनी अजून पर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही तसेच ज्या तरुणाने व्हिडिओ काढला आहे, त्याने मुख्याधिकारी साहेबांना लेखी स्वरूपात तक्रारी केली आहे.
त्या तक्रारी वर त्या तरुणाने सांगितले आहे. की येत्या पंधरा दिवसाच्या आत ठोस कारवाई झाली नाही.तर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या दालनात अन्न त्याग उपोषण करेल असे अशी लेखी तक्रारी केली आहे .
तसेच नगर परिषद मध्ये अग्निशमन विभाग प्रमुख दारूचे खांबे पिऊन दिसत असेल.तर कस होईल असं प्रश्न निर्माण झाला आहे ?
विभाग प्रमुख दारूच्या नशेत ढुस दिसत आहे. ज्या वेळी तरुणाने हा व्हिडिओ काढला, तेव्हा अग्निशमन प्रमुख व्हिडिओ मध्ये बोलतांना म्हणले की ‘तुला जे करायचं ते कर मला कोणाची भीती नाही” आणि तुला माझा व्हिडिओ कुठे टाकयच टाक मी कोणाला घाबरत नाही.अशी अशिक्षीत भाषेत अग्निशमन प्रमुख विडिओ मध्ये बोलतांना दिसुन आले.
अग्निशमन विभाग प्रमुख नितीन खैरनारवर कठोर कारवाई होणार का अस प्रश्न ? सर्व सामान्य जनतेला पडला आहे.