अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर :- येथे आदिवासींमध्ये आरक्षण मागणाऱ्या धनगर समाजाची याचीका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्याने, खऱ्या अर्थाने आज संविधानाचा विजय म्हणून आज अमळनेरात लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून फटाके फोडत जल्लोष केला.
यावेळी लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेचे पन्नालाल मावळे, जेष्ठ नेते मधुकर चव्हाण, गुलाब बोरसे, नरेश चव्हाण, भुरा पारधी, पिंटू पारधी, गणेश चव्हान, अशोक महाराज, हिम्मत पारधी, संदिप पारधी, अजय भिल, पप्पू पारधी, मच्छिंद्र भिल, सुधाकर पवार, वना पारधी, प्रदिप दाभाडे आदी उपस्थित होते.