बीड येथील हरविलेली महिला सापडली अमळनेरात.. पैलाड भागातील सजक नागरिकांच्या प्रयत्नांना यश.

 

अमळनेर (प्रहार Today वृत्तसेवा) अमळनेर येथील पैलाड भागात ५५ वर्षीय महिला गेल्या ३ दिवसांपासून फिरत होती. परंतु सदर महिला ही पैलाड भागातील श्रीकृष्ण कॉलनीत सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोहचली असता, तेथील महिला श्रीमती. कमलबाई रमेश भोई यांनी त्यांची विचारपूस केली असता. सदर महिला ही बीड जिल्ह्यतील अमळनेर येथे राहत असल्याचे सांगिले. सदर महिलेकडे संपर्कासाठी कुठलेही साधन नव्हते.सदर बाब ही कमलबाई भोई यांनी हेड कॉ.मंगल भोई, योगेश पवार यांना सांगितली त्यानुसार सादर महिलेचे फोटो काढून बीड, सांगली, सातारा, अहमदनगर, नाशिक, जळगांव छत्रपती संभाजी नगर अश्या जिल्ह्यातील whatsapp गृप वर व्हाईरल करण्यात आले. त्यानुसार योगेश पवार यांनी ११२ वर सदर महिले संदर्भात सांगितले असता, अमळनेरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री.विकास देवरे यांच्या आदेशाने तात्काळ श्री.गणेश पाटील व त्यांचे सहकारी पुनमचंद हे घटनास्थळी पोहोचले सदर महिलेची सखोल विचारपूस केली असता, सदर महिला ही बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील अमळनेर भांड्याचे येथील असल्याचे समजले त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री.विकास देवरे, श्री.गणेश पाटील, पुनमचंद, मंगल भोई, योगेश पवार व विलास पाटील (सर) इ. च्या पाठपुराव्याने सदर महिलेचा २ तासातच तपास लागला.

सदर महिलेचे नाव- पद्मिन दत्तू पोकळे वय – ५५  रा.अमळनेर (भां) ता.पाटोदा जिल्हा बीड येथील असून, सदर महिला ही अहमदनगर  येथे आपल्या भावाकडे जाण्यास निघाली होती. त्यांना घर न पडल्यामुळे ते परत अमळनेर येथे रवाना झाली असता, जळगांव जिल्ह्यातील अमळनेर येथे पोहचली असल्याचे लक्षात आले. सदर महिला ही दि.२६ जून २०२४ पासून  अहमदनगर येथून बेपत्ता असून, दि.२८ जून २०२४ रोजी अमळनेर (भां) ता.पाटोदा जि.बीड येथे पोलिसांत हरविलेली महिलेची नोंदणी रजिष्टर करण्यात आलेले होती. त्यानुसार पद्मिन पोकळे या महिलेस घेण्यासाठी त्यांचा मुलगा व नातलग हे अमळनेर येथे घेण्यासाठी आले होते.

याबाबत सदर महिलेस परत घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी माणुसकी या जगात अजून जिवंत आहे. असे शब्द वापरून, पैलाड भागातील नागरिकांबरोबर पोलीस निरीक्षक श्री.विकास देवरे, श्री.गणेश पाटील, मंगल भोई, पुनमचंद, योगेश पवार व विलास पाटील (सर) यांचे आभार मानले.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!