द्रौ.रा.कन्याशाळेचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन उत्साहात,विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले संमेलनविविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले संमेलन.

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर:- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित द्रौ.रा.कन्याशाळेचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील तर आधार संस्थेच्या भारती पाटील प्रमुख अतिथी होत्या.
द्रौ.रा.कन्याशाळेचे २ दिवसीय स्नेहसंमेलन ११ व १२ फेब्रुवारी रोजी पार पडले.यावेळी
खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक,उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,माधुरी पाटील,विश्वस्त वसुंधरा लांडगे,शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल,संचालक हरी भिका वाणी,योगेश मुंदडा,संस्थेचे आश्रयदाते विवेकानंद भांडारकर,निलेश भांडारकर,विनोद भांडारकर,प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,सहसचिव धीरज वैष्णव,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्र सोनवणे,पी.बी.ए.मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक जे.एस.देवरे, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका बाळासाहेब पवार,मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी,उपमुख्याध्यापक एस.बी.निकम,पर्यवेक्षक विनोद कदम,पर्यवेक्षिका एस.पी.बाविस्कर,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भारती आठवले,शिक्षक प्रतिनिधी जे.व्ही.बाविस्कर,शिक्षकेतर प्रतिनिधी जयश्री भालेराव, तसेच संस्थेच्या इतर शाळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जयश्री पाटील,भारती पाटील यांनी विद्यार्थिनींना स्व.संरक्षणावर भर देण्याचा सल्ला दिला.सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम,आरोग्याची काळजी यावर देखील मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
पहिल्या दिवशी आनंद मेळावा उत्साहात पार पडला.यावेळी विद्यार्थिनींनी विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल उभारले होते.दुपार सत्रात विविध सांस्कृतिक, देशभक्ती वर आधारित नृत्य,एकांकिका,गीत,पथनाट्य सादर करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी शेलापागोटे,प्रश्नमंजुषा तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या सत्रात तत्वज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ.राधिका मोहन पाठक, शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे तसेच थिकनेस उदे इंडिया मुंबई येथील संस्थेच्या प्रमुख तसेच शाळेच्या माजी विद्यार्थिनी मनीषा विवेक म्हसकर उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल यांनी मुख्याध्यापिका,उपमुख्याध्यापक,
पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन उपशिक्षिका एस.बी.उपासनी यांनी केले तर आभार पर्यवेक्षक विनोद कदम यांनी मानले.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!