जळगाव वन विभागाचा भोंगळ कारभार लांडोरखोरी वनोद्यानात सुरक्षारक्षक परवाना नसलेल्या एजन्सीला दिला बेकायदा कंत्राट.!

मुक्ताईनगर प्रतिनिधी:-

जळगाव वनविभागाच्या लांडोरखोरी
वनोद्यानात सन २०१७ पासून शिवा सर्विसेस मार्फत खाजगी सुरक्षा पुरवली जात असून शिवा सर्विसेस कडे सुरक्षारक्षक पुरवणे कामी शासनाचा कोणताही अधिकृत परवाना नसताना सुद्धा वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध साधून सुरक्षा रक्षक पुरवण्याचा कंत्राट शिवा सर्विसेसने मिळवला असल्याची तक्रार स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
वन विभागाचा हा भोंगळ, भ्रष्ट कारभार एवढ्या वरच थांबला नसून शिवा सर्विसेस ला सन २०१७ मध्ये खाजगी सुरक्षा रक्षक पुरवणे कामी दिलेला ठेका हा कोणतीही निविदा प्रकाशित प्रसिद्ध न करता याच शिवा सर्विसेला वारंवार नियमबाह्य पद्धतीने तीन-तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे यावरूनच ठेकेदाराने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खिशात ठेवले असल्याचे दिसून येत आहे.शिवा सर्विसेस कडे कोणताही सुरक्षा रक्षक परवाना नसल्याने सदर ठेकेदार सुरक्षा रक्षकाच्या अनुषंगाने शासनाकडे जमा करावा लागणारा जीएसटी, व्यवसाय कर बुडवला जात असून सदर ठेकेदार व वन विभागाच्या आर्थिक संगणमताने शासनाच्या जीएसटी तसेच व्यवसाय कर विभागाची फसवणूक केली जात आहे.
शिवा सर्विसेसच्या ठेकेदाराकडून संबंधित सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांना वेतन,ईपीएफ , ईएसआय देताना सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन कायद्याला तिलांजली दिली जात आहे.
त्यामुळे आजतागायत संबंधित ठेकेदाराने शासनाचा बुडवलेला जीएसटी व व्यवसाय कर दंडासह वसूल करण्यात येऊन सदर सुरक्षा रक्षकांना किमान वेतन कायद्यानुसार मागील थकीत ईपीएफ,ईएसआय व्याजासह देण्यात यावा यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!