अमळनेर :- राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी कानपुर यांनी दिव्यांग लोकांना केलेल्या मारहाणीचा जाहीर निषेध व कायदा 2016 अन्वये कलम 92 नुसार दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावे.
राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांनी कानपुर येथे राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे कार्यकर्ते व पदाधीकारी निवेदन देण्यासाठी गेले असता . त्यांच्यावर काँग्रेस पार्टी कानपुर च्या कार्याकर्त्यांनी व पोलीस प्रशासनानी धक्काबुक्की व मारहाण केलं . दिव्यांग बांधवांना जखमी केले .सदरील बाब ही अंत्यत निंदनीय असुन राष्ट्रीय दिव्यांग पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत जाहिर निषेध,
तसेच कायदा 16 कलम 92 अन्वये धक्काबुक्की व मारहाण करणाऱ्या राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी कानपुर व दोषी असलेले पोलिस कर्मचारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे.
अन्यथा सर्व दिव्यांग बंधू व आंदोलन व उपोषणास बसल्याशिवाय राहणार नाही.अस निवेदनात म्हटले आहे.यावेळी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.