अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर :- अमळनेर तालुक्यातील नंदगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील नंदगाव येथे भोलेनाथ मित्र मंडळ व निर्णय जनसेवा ब्लड बँक धुळे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
दरवर्षी छत्रपती शिवजयंतीस नंदगाव भोलेनाथ मित्रमंडळ विविध कार्यक्रम आयोजित करत असतात त्यांत विविध समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. अत्यस्वस्थ रुग्णांसाठी रक्त हे मोलाचे असते. यासाठी रक्तदानाचे महत्व समजून यावर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ५५ बॅग रक्त संकलित करण्यात आले. शिबिराची सुरवात गावांतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाजवळ रविवारी सकाळी आठ वाजता रक्तदानाला सुरुवात करण्यात आली. दुपारी बारा वाजेपर्यत ५५ बॅग रक्त संकलित करण्यात आले.
यावेळी जनसेवा ब्लड बँकेचे पवन जगदाळे, मनोज माळी, हेमंत माळी,सोनिया पाडवी, जयश्री चौरे, भरत बारेला,संदिप पावरा आदी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. तसेच शिबिर यशस्वीतेसाठी नंदगाव येथील भोलानाथ मित्र मंडळाचे अरुण पाटील, पृथ्वीराज पाटील, बापु पाटील, भरत पाटील, मनोहर पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी रक्तदान उपक्रमाबाबत या वर्षाचे नियोजन अत्यंत घाईत झाले असले तरी पुढील वर्षी रक्तदान शिबिर मोठ्या स्वरूपात आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.