झाडी येथील प्रभारी ग्रामसेवका विरुद्ध लाक्षणिक उपोषणांद्वारे कारवाईची मागणी.

प्रतिनिधी :- नूरखान

अमळनेर तालुक्यातील झाडी ग्रामपंचायत गैरकारभारा विरुद्ध प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2024 रोजी अमळनेर तहसील,पंचायत समितीच्या आवारात उपोषण करत आहोत. आम्ही या लोकशाही मार्गाने आमच्या गावातील ग्रामपंचायतच्या प्रशासनाला जाग यावी एवढी अपेक्षा व्यक्त करून अकार्यक्षम,अनियमित,अतिरिक्त चार्ज दिलेले ग्रामसेवक श्री सुकलाल मालचे यांचा कार्यभार तात्काळ काढून आम्हास कायमस्वरूपी पूर्ण वेळ,नियमित ग्रामसेवक तात्काळ द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे.
याशिवाय वर निवेदनात जोडल्याप्रमाणे आर्थिक गैरव्यवहार, प्रशासनिक अनागोंदी,सरपंचांनी केलेला एकाधिकार व हुकूमशाही केलेला एकतर्फी गैरकारभार, गायरान जमिनीवरील वृक्षतोड करून रकमेचा केलेला आर्थिक अपहार,अतिक्रमण,आपात्रता प्रकरण, ग्रामपंचायत विरुद्ध केलेला न्यायालयीन दावा या संदर्भात देखील आमच्या मागण्या असून त्या जबाबदार अधिकारी वर्गाकडून त्यांची दखल घेऊन सखोल चौकशी व्हावी.विविध सभांच्या प्रोसिडिंगमध्ये अनियमितता, फेरफार, खोट्या सह्या,बनावट इतिवृत्त,पंधरावा वित्त आयोगाच्या सर्व विकास कामांच्या चौकशी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित वेतन इ वरिल मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठीच आम्ही या मार्गाचा अवलंब केला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला आम्ही दीड वर्षापासून तोंडी व लेखी विनंती केल्या या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष,इन कॅमेरा,पारदर्शक, सर्व ग्रामस्थांना बोलावून चौकशी व्हावी. गावाच्या आरोग्य व पाणी प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. गावाची सार्वजनिक अस्वछता, अशुद्ध पाणी,अनियमित पाणीपुरवठा, शौचालय-मुताऱ्या दुर्गंधी व रोगाचे माहेरघर झाले आहेत.याची दखल घ्यावी.
आज उपोषणाला बसून ग्रामपंचायत सदस्य निंबा लोटन पाटील व कलाबाई वसंतराव पाटील यांनी मागण्या केल्या तर त्याकरिता गावातील संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी सक्रिय पाठींबा देऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. याप्रसंगी शशिकांत पाटील,स्वानंद सयाईस,राहुल दामोदर पाटील, संजय पाटील, वसंतराव पाटील, दिनेश सुभाष पाटील, नितीन अभिमन पाटील, व्यंकट बापूजी उपस्थित होते

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!
नमस्कार!
आम्ही आपली काही मदत करू शकतो?