30 खाटांचे ग्रामिण रुगणालयात मंजूरी -मंत्री अनिल पाटील.

अमळनेर प्रतिनिधी

पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामिण रुग्णालयात होणार श्रेणीवर्धन.

अमळनेर-तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामिण रुग्णालयात होणार रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून याबाबत राज्यशासनाने सदर आरोग्य केंद्राचे 30 खाटांचे ग्रामिण रुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन करण्यास मंजूरी दिल्याची माहिती राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय दि 30 जानेवारी 2014 रोजी प्रसिद्ध झाला असून यात विशेष बाब म्हणून 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.सदर मंजुरीमुळे पातोंडा परिसरातील 20 ते 25 गावांना याच लाभ होणार असून ग्रामिण रुग्णालय झाल्यानंतर याठिकाणी डॉक्टर व आरोग्य स्टाफ सह आरोग्य सुविधा वाढणार असल्याने ग्रामीण जनतेला आपल्या परिसरातच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
दरम्यान सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती यासाठी पातोंडा येथील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील यांनी विशेष पाठपुरावा केला असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी देत त्यांचे विशेष कौतुक देखील केले,मात्र या मोठ्या मागणीसाठी वरिष्ठ स्तरावरील पाठपुराव्याची गरज असल्याने मंत्री श्री पाटील यांनी ताकदीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन आरोग्य मंत्रालयाने सदर मंजुरी दिली आहे.याकामी पातोंडा सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य लाभले.
सदर मंजुरी बद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस व ना अजित पवार, आरोग्य मंत्री ना तानाजी सावंत,ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!