अमळनेर प्रतिनिधी :-
अमळनेर :- संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेल्या नॅशनल लेवल अबॅकस च्या परीक्षेत ५००० विद्यार्थी सहभागी होते. अबॅकस स्पर्धेत सात मिनिटात १०० गणित सोडवण्याचे विद्यार्थ्यांना आव्हान दिले जाते. यात चाळीसगाव, जळगाव, यावल, बीड, संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
जागतिक स्पर्धेच्या युगात आपली मुलं टिकवण्यासाठी आपल्या मुलांना विविध कौशल्य व कलागुणांना वाव मिळाला पाहिजे त्यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत जि चॅम्प अबॅकस क्लासच्या संचलिका सौ मनीषा विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात २० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
यात शुभम विलास पाटील (4th level), निशान विनोद पाटील (3rd Level) या विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले त्यांना सुपरस्टार ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. आर्यन महेश पाटील, आयुषी हेमंत भामरे, गौरव धीरज पवार, देवेंद्र भिकन कोळी या विद्यार्थ्यांना फर्स्ट रँक चे ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. विहान मनोज शिरोडे याला सेकंड रँक ची ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यज्ञा संदीप बोरसे वीरेन विलास पाटील, विहान विजय बोदानी, तनय राकेश माळी, महेश रोहिदास मिस्तरी, ज्ञानराज योगेश पाटील, मिसबा जावेद पिंजारी, श्रावणी हेमंत भामरे, देवेंद्र शरद पाटील, पियुष मनोज चौधरी, हिमांशू मनोज चित्ते, हिमांशू धीरज पवार, करणसिंग प्रेमेन्द्र सिंग राजपूत यांचा चॅम्पियन ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला या सर्व विद्यार्थ्यांचा गोल्डमेडल व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.
जी चॅम्प अबॅकस संचलिका सौ मनीषा पाटील यांना मागील वर्षाप्रमाणे Best Abacaus Teacher व Best Statup center Award देऊन सन्मानित करण्यात आले. हा संपूर्ण कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला. जी चॅम्प अबॅकस गेनियन एज्युकेशन चे संचालक योगेश देशमाने व आरती देशमाने यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संभाजीनगर येथे संपन्न झाला.