महिला दिनाचे औचित्य साधत साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिजकी वही’ हा खास प्रयोग होणार सादर.

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर :- येथे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे महिला दिनाचे औचित्य साधत नाविन्यपूर्ण वाचकांसाठी एक मेजवानी कार्यक्रम ठेवला आहे.. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय यापूर्वीही संचालक मंडळाने अनेक उपक्रम ठेवले होते.
परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिजकी वही’ या अरुण कोल्हटकर यांच्या कविता संग्रहातील निवडक कविता जिवंत करून थक्क करणारा प्रयोग ठेवण्यात आलेला आहे. तरी अमळनेर करांनी पाहण्यासाठी विसरू नये हा प्रवेश सर्वांसाठी खुला आहे गुरुवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी जुना टाऊन हॉल अमळनेर येथे सायंकाळी सहा वाजता ठेवण्यात आलेला आहे तरी जास्तीत जास्त तालुक्यातील व शहरातील वाचकप्रेमी,श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व चिटणीस आण्णासाहेब प्रकाश वाघ व संचालक मंडळ यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे..मंगळ ग्रह मंदिर संस्थान अमळनेर यांनी पू साने गुरुजी ग्रंथालय संचालित पू साने गुरुजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास विद्यार्थी विद्यार्थिनी यांना अद्यावत शिक्षण मिळावे या साठी भले मोठे डिजिटल स्क्रीन सप्रेम भेट दिली
या डिजिटल स्क्रीन चे उद्घाटन शंभू पाटील ज्येष्ठ रंगकर्मी परिवर्तन जळगाव यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रसंगी श्री मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांच्या या भरघोस देणगीतून हे साकार झाले म्हणून सरांचे आभार अन कौतुक सोहळा होणार आहे…

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!