अमळनेर प्रतिनिधी
गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील, धुळे शिवसेनेचे सतीश महाले यांची विशेष उपस्थिती.
अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मगंळग्रह मंदिर परिसरात १ ते ३ मार्च दरम्यान श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा पार पडत आहे. विशेष म्हणजे विश्वात कोठेही नसतील अशा आकाराची मंदिरे मंगळग्रह मंदिर परिसरात उभारली आहेत. त्यामुळे अमळनेर शहराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. आजच्या पूजेसाठी अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, जळगावच्या गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व शिवसेनेचे धुळे जिल्हाप्रमुख (बाळासाहेब ठाकरे गट) सतीश महाले यांची विशेष उपस्थिती होती.
२ रोजी सकाळी ८.०० ते दु. १२.०० या प्रथम सत्रात प्रात:पूजन, जलयात्रा, वास्तूशांती शांतीक पौष्टिक हवन भक्तिमय वातावरणात पार पडले. या पूजेसाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील नंदवाळकर, संजय पुनाजी पाटील, आशिष चौधरी, महेंद्र माळी, रोहित सिंघवी, विनोद थोरात, मनोज बारी, राहुल शांताराम सोनवणे, शालीक पंडीत बहिरम, दिलीप आत्माराम बहिरम आणि निलेश भांडारकर आदी, तर दुपारी २.०० ते सायं. ६.०० या द्वितीय सत्रात मुख्य देवता हवन, मंदिर व मूर्ती स्थापन, तत्वन्यास, धान्यादीवास, शय्याधीवास, सायंपूजा होऊन आरती झाली. या पूजेसाठी गोदावरी फाउंडेशन जळगावचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, रवींद्र बोरसे, पंकज पाटील, संजय प्रल्हाद बाविस्कर, शिवसेनेचे (बाळासाहेब ठाकरे गट) धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले, डॉ. प्रशांत शिंदे, अरुण भावसार, नितीन कोल्हे, मधुकर सोनार, मनोहर पाटील व खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते.
या पूजेसाठी वेदमूर्ती केशव पुराणिक शास्त्री, सागर कुलकर्णी शास्त्री, प्रतीक मुळे शास्त्री, प्रसाद साठे शास्त्री, वैभव जोशी शास्त्री, प्रसाद भंडारी शास्त्री, तुषार दीक्षित शास्त्री, जयेंद्र वैद्य शास्त्री, गणेश जोशी शास्त्री, अक्षय जोशी शास्त्री, मंदार कुलकर्णी शास्त्री, चंद्रकांत जोशी शास्त्री, विनोद पाठक शास्त्री, हेमंत गोसावी शास्त्री, नरेंद्र उपासनी शास्त्री, सारंग पाठक शास्त्री, सुनील मांडे शास्त्री, व्यंकटेश कळवे शास्त्री आदी पुरोहितांनी पौरोहित्य केले.
महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिर परिसर केळीचे खांब, आंब्यांच्या पानांची तोरणे, भगवे ध्वज, पताका, विविध फुले व माळा आदींनी आकर्षकरित्या सजला असल्याने ते दर्शन व पूजा-अभिषेकासाठी आलेल्या भाविकांचे आकर्षण ठरले. पूजा-विधीवेळी अधूनमधून गायिली जाणारी देवादिकांची स्तवन गीते व भक्तिगीते यामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी वेंकिज इंडिया प्रा. लि. लिमिटेड या कंपनीतर्फे शुद्ध गावरान तुपातील मोतीचूर लाडू प्रसाद म्हणून भाविकांना दिवसभर वाटप करण्यात आले.
प्राणप्रतिष्ठा महासोहळ्याच्या यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एन. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, मंगल सेवेकरी विनोद कदम, व्ही. व्ही. कुलकर्णी, प्रकाश मेखा, आशा महाले, आनंद महाले, स्वाती महाले, डी. ए. सोनवणे, पुषंद ढाके, उज्ज्वला शहा आदींसह मंदिरातील सेवेकऱ्यांचे सहकार्य लाभले.
महासोहळ्याची आज होणार पूर्णाहुती.
रविवार, ३ मार्च रोजी सकाळी ८.०० ते दु. १२.०० दरम्यान प्रात: पूजन, देव प्रबोधन, प्रासाद प्रवेश, उत्तरांगहवन, बलिदान, प्राणप्रतिष्ठा, महापूजा, पूर्णाहुती व महाआरती होणार आहे.
रावेरच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांची नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळा दरम्यान विशेष भेट.
ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिर परिसरात आयोजित नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळा दरम्यान रावेरच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांनी विशेष भेट दिली. रक्षा खडसे यांनी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या विश्वात कुठेही नसलेल्या अशा आकाराच्या मंदिरांची पाहणी करत मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आलेल्या नियोजनाचे कौतुक केले. तत्पूर्वी रक्षा खडसे यांनी मंदिरात जाऊन श्री. मंगळग्रह देवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व विश्वस्त मंडळाने त्यांचा शाल, श्रीफळ व मंगल प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा स्मिता उदय वाघ, भाजपा शहराध्यक्ष विजय राजपूत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.