अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर- येथे कविवर्य पुरूषोत्तम नारखेडे (मालतीकांत) यांच्या स्मृती प्रित्यर्थ सतरावे बहिणाबाई सोपानदेव खान्देश राज्य मराठी साहित्य संमेलना तर्फे शांतीनिकेतन शाळेतील शिक्षक, पत्रकार तथा कवी अजय भामरे लिखित “क्रांतीलहर” या काव्यसंग्रहाला वाड्.मय पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार सोहळा रविवारी दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी सरदार वल्लभभाई पटेल ,लेवा भवन हाॅल ,जळगाव येथे पार पडला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर ,संमेलनाचे स्वागत अध्यक्ष ,ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणे, साहित्यिक वा.ना. आंधळे, माया दुप्पळ व मंचावर उपस्थित मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते सन्मानपत्र ,सन्मानचिन्ह , गुलाब पुष्प देऊन त्यांना गौरविण्यात आले. अजय भामरे हे चांगल्या पद्धतीचे संघटक आहेत.समता शिक्षक परिषदेचे पदाधिकारी आहेत.उत्स्फूर्त कविता करणारे कवी आहेत. आपल्या कवितेत त्यांनी पुरोगामी विचारांची मांडणी केलेली आहे .अजय भामरे हे संवेदनशील ,वास्तववादी कवी आहेत. त्यांना गायनाची आवड आहे, त्यामुळे त्यांच्या कविता गेयता असलेल्या आहे. त्यांनी सामाजिक कामाचा वसा घेतलेला आहे.१८ वे विद्रोही साहित्य संमेलनात त्यांच्या तीन कवितांचे प्रभावीपणे सादरीकरण झालेले आहे.अजय भामरे हे साप्ताहिक ‘लेखन मंच’ चे संपादक तथा व्हाईस ऑफ मिडियाचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यांच्या साप्ताहिकामध्ये महामानवांचे विचार मांडले जातात. यावेळी साप्ताहिक ‘लेखन मंच’ चे उपसंपादक सोपान भवरे सर , समता शिक्षक परिषद माध्यमिक चे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिसोदे सर, प्राथमिकचे तालुकाध्यक्ष बापूराव पाटील (ठाकरे सर), प्रोटॉन संघटनेचे जिल्हा महासचिव मिलिंद निकम सर आदी उपस्थित होते. यानिवडीबद्दल त्यांच्यावर शैक्षणिक ,सामाजिक तसेच हिंतचिंतक व मित्रपरिवाराकडून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.