प्रतिनिधी : प्रहार Today न्यूज नेटवर्क दि:-२५ जानेवारी २०२४ रोजीच्या जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक अमळनेर श्री.विजय शिंदे यांची अचानक जिल्हा नियंत्रण कक्ष ( कंट्रोल रूम ) जळगांव येथे बदली केली आहे. सदर बदली ही गेल्या अनेक दिवसांपासून अमळनेर शहरात उधाण आलेल्या चर्चेनुसारच झालेली असावी ? अशी चर्चा अमळनेर शहरात सुरु आहे. तथाकथित प्रकरणांमध्ये NPDA अंतर्गत वेळोवेळी कारवाई केल्यामुळे अमळनेर पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे हे अमळनेर मध्ये हिरो झाले. परंतु ज्या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल होणे कायद्यानुसार अभिप्रेत होते. त्या प्रकरणांमध्ये त्यांनी सतत कानाडोळा केला कारणेदाखवण्यात मात्र पटाईत असलेले विजय शिंदे शेवटी जानेवारी २०२४ मधील अमळनेर येथील एका पोलिसावर झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत शेवटी विजय शिंदे यांचे देखील नाव समोर आले.! याबाबत अमळनेर मधील काही राजकीय व सामाजिक क्षेत्रातून विजय शिंदे यांचेविरुद्ध जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडे तक्रारी सुरु झाल्या त्याच तक्रारींच्या अनुषंगाने शिंदे यांना इतरत्र न पाठवता नियंत्रण कक्ष ( कंट्रोल रूम ) जळगांव येथे रवानगी केली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
शेवटी अमळनेर पोलीस स्टेशनची धुरा नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री.विकास सुकदेव देवरे यांच्या हाती देण्यात आली असून, काल अमळनेर येथे येऊन त्यांनी आपला पदभार स्विकारला आहे.
लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभुमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील २८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश शनिवारी दि.१३ जानेवारी रोजी काढले आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केंद्रीय निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आल्या आहेत.