अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर-मतदारसंघात मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत असून तालुक्यातील निम येथील राष्ट्रीय काँगस पार्टी सह चौधरी मित्र परिवारातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
गोवर्धन चे सरपंच पंकज पाटील यांनीही याप्रसंगी राष्ट्रवादीत प्रवेश केला.महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होऊन मंत्री श्री पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.यावेळी भगवान भिल, निम गावाचे सरपंच सुशील पाटील,तालुका फ्रुटसेल सोसायटीचे व्हाईस चेअरमन पुंजू श्रीसागर,जितू धनगर बन्सीलाल भील, बळवं कोळी ,दिलीप कोळी अरुण कोळी, संभाजी पाटील, हर्षल चौधरी, गणेश कोळी, किरण पाटील, दिनेश पाटील,मयूर पाटील, गोलू पाटील आदींचा समावेश होता. दरम्यान उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व मंत्री अनिल पाटील यांचे हात बळकट करण्याचा निर्धार सर्वानी व्यक्त केला.