अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर: १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन ,अमळनेर आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय विद्रोही काव्य स्पर्धा घेण्यात आली होती.
या स्पर्धेत अजय भामरे यांच्या कवितेला जास्तीत जास्त व्हिवज, लाईक मिळाल्याने विद्रोही साहित्य संमेलनाच्या मुख्य मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना द्वितीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र, अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी, कार्य.संघटक ,सत्यशोधक किशोर ढमाले, विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष गौतम मोरे, मुख्य समन्वयक प्रा .अशोक पवार, कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, मिलिंद निकम सर, राजीव हाके आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या या यशाबद्दल धनदाई संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी .डी पाटील, प्राचार्य रावसाहेब के.डी पाटील प्रा.अरूण महाजन तसेच शैक्षणिक, सामाजिक व अन्य विविध क्षेत्रातील पदाधिकारी ,मान्यवरांनी कौतुक व अभिनंदन केले.