(प्रहार Today वृत्तसेवा) चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील पोदार शाळा परिसरात मोटरसायकलवर आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी दि.७ तारखेच्या मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास दगडफेक करत हवेत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे सुमित भोसले यांच्यासह घरावर दगडफेक करत हवेत गोळीबार केल्याने चाळीसगाव शहर परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले मात्र दरम्यानच्या कालावधी दगडफेक करत हवेत गोळीबार करणारे अनोखी पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र घटनास्थळावरून पोलिसांना एक जिवंत काडतूस तीन रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट आणि चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांति ठेवण्याचे आवाहन केले आहे. घटनेच्या मागे कोणतीही गुन्हेगारी यंत्रणा किंवा वैयक्तिक वाद आहे का ?, याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी या घटनेच्या संदर्भात कोणतीही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात आलेली आहे. सारंग बेलदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा सुमित भोसले व महेंद्र (बाळू) मोरे यांच्या मुलांमधील पूर्व वैमानसातून झाला असावा असे म्हटले जात आहे संशयित महेंद्र (बाळू) मोरे यांच्या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याठिकाणी गेले परंतु त्या ठिकाणी कुणीही आढळून आले नाही. मात्र घरात घातक हत्यारे आढळून आले आहेत. कोयता, गुप्ती, सहा जिवंत राऊंड, एक स्टीलची परशु, कुऱ्हाड, एक बेसबॉल खेळण्यासाठी वापरण्यात येणारी लाकडी बॅट अशा हत्यारांचा यात समावेश आहे. सर्व नागरिकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, आणि कोणतीही असामाजिक कृत्ये स्वीकारली जाणार नाहीत, असे स्थानिक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत