मारवड कळमसरे मार्गे नंदुरबार बस धावणार.

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर – चोपडा आगाराची एस टी बस मारवड कळमसरे शहापूर मार्गे नंदुरबार धावणार असल्याचे आगारप्रमुख यांनी सांगितले.ही बससेवा ता.19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ही बस चोपडा आगारातून अमळनेर धार, मारवड, कळमसरे,शहापूर,बेटावद,नरडाणा,शिंदखेडा, दोंडाईचा मार्गे नंदुरबार पर्यंत धावणार आहे. सध्यस्थीतीत लग्न सराईच्या पाश्वभूमीवर ही बस सुरु करण्यात येणार असून,यामुळे थेट गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचीही सोय होणार आहे.दरम्यान प्रवाशांमध्ये आनंद वातावरण पसरले असून,ही बस चोपडा येथून सकाळी 7 वाजता निघेल तर नंदुरबार येथे पोहचण्याची साधारण वेळ ही 11.30 वाजता पोहचेल. तर नंदुरबार हुन बस परत येताना दुपारी 12.30 वाजता निघेल. चोपडा येथे 4.30 वाजेपर्यन्त पोहचेल. यात कळमसरे मारवड येथे नंदुरबार जाताना सकाळी 8.30 ते 9 वाजेपर्यन्त येईल व नंदुरबारहुन चोपडा जाताना दुपारी साडे तीन ते चार वाजेपर्यंत येईल याची नोंद प्रवाशांनी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे..ही बस सेवा मारवड, कळमसरे, शहापूर येथील ग्रामस्थांच्या मागणीवरून शहापूरचे सुपुत्र महेंद्र पाटील आगार व्यवस्थापक चोपडा यांच्या प्रयत्नांनी 19 फेब्रुवारी पासून चालू होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!